Weather Forecast : मुंबईत जोरदार पावसाची हजेरी, कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजाप्रमाणं राज्याची राजधानी मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. आरे परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. तर, हवामान विभागानं मुंबईला यलो अलर्ट दिला असून जोरदार पाऊस सुरु आहे.

Weather Forecast : मुंबईत जोरदार पावसाची हजेरी, कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 8:18 AM

मुंबई: भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजाप्रमाणं राज्याची राजधानी मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. आरे परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. तर, हवामान विभागानं मुंबईला यलो अलर्ट दिला असून जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईच्या चेंबूर, घाटकोपर आणि सायन परिसरात मुसळधार पाऊस झाला. आयएमडीनं महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अ‌लर्ट दिला आहे. तर, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असं देखील सांगण्याचत करण्यात आलं आहे.

कोकण पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट

हवामान विभागानं सोमवारसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌लर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट दिला आहे.

ठाण्यासह वसई विरारमध्ये रात्री जोरदार पाऊस

ठाणे आणि वसई विरारमध्ये रविवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याचं समोर आलं होतं. वसई विरारमध्ये रात्री दहाच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. मध्यरात्रीनंतर वसई विरारमध्ये पावसानं उघडीप घेतली होती.

नाशिकमध्ये रात्रभर पाऊस

नाशिक जिल्ह्यात आणि शहर परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. धरण पाणलोट क्षेत्रात देखील रात्रभर पाऊस झाला आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून आज पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. काल गंगापूर धरणातून करण्यात 500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गोदावरी घाटाजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगानं वारे वाहतील. तसेच राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा, अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीनं हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. तर, पुढील चार ते पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

14 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, नंदूरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड, आणि अमरावती यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

15 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं पालघर जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सातारा, पुणे जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, गुरुवारी 16 सप्टेंबरला पालघर जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

इतर बातम्या:

Maharashtra Rain, Weather Update, Maharashtra Rain Update, Weather Forecast, Mumbai rain वेदर फॉरकास्ट, महाराष्ट्र रेन, वेदर अपडेट , महाराष्ट्र रेन अपडेट, महाराष्ट्र रेन अपडेट , मुंबईत जोरदार पावसाची हजेरी

Nana Patole | भाजपचा OBCवर आधीपासून अन्याय, आरक्षण न मिळण्यासाठी भाजप जबाबदार : नाना पटोले

Tv9Podcast | 100 जणांची हत्या, 40 पेक्षाही जास्त टॅक्सी चालकांना मारुन मगरींना खाऊ घालणारा डॉक्टर

Maharashtra Weather Forecast Heavy Rainfall at Mumbai Rain Maharashtra Rain live Updates IMD Predicted rainfall increased Kokan and Western Maharashtra due to low pressure area in bay of Bengal

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....