AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange | आपण कोणत्या पक्षाचे…मनोज जरांगे प्रथमच स्पष्ट बोलले

Manoj Jarange Patil | अजय महाराज बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत. अजित पवार यांचे दोन आमदार त्यामध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काही लोक हे काम करत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रवक्ता पण त्यामध्ये आहेत.

Manoj Jarange | आपण कोणत्या पक्षाचे...मनोज जरांगे प्रथमच स्पष्ट बोलले
मनोज जरांगे पाटील
| Updated on: Feb 26, 2024 | 7:15 AM
Share

संजय सरोदे, जालना, दि. 25 फेब्रुवारी 2024 | मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण तीव्र करण्याचा इशारा दिला. यावेळी त्यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवत आहेत. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचेही काही चालत नाही. आपण कोणत्या पक्षाचे आहोत, यावरुन आरोप केले जात आहे. मी आताच सांगतो, मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी कोणत्याही पक्षाचे काम करत नाही. मी समाजाचा आहे. समाज माझ्यासाठी देव आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. अजय महाराज बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. त्याला उत्तर देताना आपण कोणत्याही पक्षाचे नसल्याचे त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा डाव- मनोज जरांगे

मराठा समाजासंदर्भात सर्व काही देवेंद्र फडवणीस करत आहे. अजय महाराज बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत. अजित पवार यांचे दोन आमदार त्यामध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काही लोक हे काम करत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रवक्ता पण त्यामध्ये आहेत. मी आज टोकाचा निर्णय घेत आहे. मला मारण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. माझे एन्काउंटर करण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो. माझा बळी घ्या.

फडणवीस अनेकांना संपवतात

एकनाथ शिंदे सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करतील. परंतु फडवणीस करू देत नाही. अंतरावालीमध्ये महिलांवर हल्ला झाला. त्या प्रकरणात फडणवीस यांना माफी मागावी लागली. त्यामुळे माझ्यावर फडवणीस यांचा राग आहे. त्याचे जो ऐकत नाही त्यांना ते संपवतात. त्यांना मला बदनाम करायचे आणि संपवायचे आहे. फडणवीस यांना कोणी पुढे गेलेले आवडत नाही. त्यांच्यामुळे पक्षातील लोकही त्यांना सोडून जात आहे. खडसे, पटोले फडणवीस यांच्यामुळे सोडून गेले.

बामणी कावा माझ्या पुढे चालणार नाही

महादेव जानकर यांनाही फडणवीस यांनी मोठे होऊ दिले नाही. बामणी कावा माझ्या पुढे चालणार नाही. मी पायी तुझ्या कडे येत आहे, तुझ्या दारात येत आहे. माझा बळी घेऊन दाखवा. माझ्या उपोषणा दरम्यान मृत्यू झाल्यास मला सागर बंगल्यावर नेऊन टाका. खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे. बारसकर, राणेंच्या मागून माझ्यावर हल्ला करु नका.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.