maratha reservation | सर्वात मोठी बातमी, मनोज जरांगे मुंबईकडे, पोलिसांनी मार्ग बदलला, मुंबईत मोठा फौजफाटा

maratha reservation | मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईत दाखल होणार आहे. त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे- मुंबई महामार्गावरील मार्ग बदलण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

maratha reservation | सर्वात मोठी बातमी, मनोज जरांगे मुंबईकडे, पोलिसांनी मार्ग बदलला, मुंबईत मोठा फौजफाटा
manoj jarange patilImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 10:52 AM

पुणे, मुंबई, दि.25 जानेवारी 2024 | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते पुणे शहराकडून मुंबई शहराकडे निघाले आहेत. पुणे जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता लोणावळ्यात मनोज जरांगे पाटील दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्च्याला ठरलेल्या कार्यक्रमानुसार १२ ते १४ तास उशीर झाला आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करत असताना नवीन मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. एक्स्प्रेस महामार्गावर सीआरपीएफ जवानांचा कडेकोट बंदोबस्त लावला आहे. मराठा आंदोलक एक्स्प्रेस हायवेवर चढू नये बंदोबस्त लावला आहे. मनोज जरांगे यांचा आज वाशीमध्ये मुक्काम असणार आहे.

मुंबईकडे येतानाचा मार्ग बदलला

मनोज जरांगे यांचा लोणावळ्यातून पनवेलकडे येतानाचा मार्ग पोलिसांनी बदलला आहे. आंदोलकांना पुणे मुंबई मार्गावर जुन्या घाटातून जाण्याच्या पोलिसांनी सूचना केल्या आहेत. परंतु आंदोलक नवीन मार्गावरुन जाण्याचा भूमिकेवर ठाम आहे.

आझाद मैदानासंदर्भात नोटीस

आझादा मैदानावर मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना नोटीस देण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. आझाद मैदानाची क्षमता पाच हजार आहे. परंतु लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यामुळे आझाद मैदानाच्या क्षमतेची मनोज जरांगे यांना जाणीव करुन द्या, असे आदेश न्यायालयाने दिले आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईतील एपीएमसीतील सर्व मार्केट कडकडीत बंद

मनोज जरांगे पाटील यांचे भगवे वादळ मराठा आरक्षणासाठी मुंबईत येत आहे. ते आज नवी मुंबईत धडकणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसीतील सर्व मार्केटमध्ये कडकडीत बंद करण्यात आला आहे. वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये त्यांची रात्री राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पाच ही बाजारात जवळपास चार ते पाच लाख लोकांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केल्याने सर्व बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले.

मुंबईत पोलिसांचा फौजफाटा

मनोज जरांगे पाटलांचा लाखोंचा जनसमुदाय हा नवी मुंबई शहरांमध्ये दाखल होणार आहे. त्यासाठी नवी मुंबई आणि मुंबईचे पोलीस सज्ज झाले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह अडीच ते तीन हजाराचा फौज फाटा हा मैदानात उतरला आहे. मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारच्या वेगळ्या घटना घडू नये यासाठी पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे.

नाशिक शहरात १५ दिवस मनाई आदेश लागू

नाशिकमध्ये विनापरवानगी मोर्चा, आंदोलन, निदर्शने करण्यास ८ फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. मराठा आरक्षण आंदोलन, राजकीय पक्षांच्या आमदार फूट प्रकरणी न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा

पहिली पास व्यक्ती करतोय मराठ्यांचे सर्वेक्षण, मग कसे मिळणार आरक्षण… व्हिडिओ व्हायरल

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.