लालपरीला जाळपोळीचा धसका, नवीन स्लीपर बसेस परत बोलवल्या, कोणत्या जिल्ह्यांत काय घडले…

Maratha Reservation | मराठा आंदोलन राज्यात उग्र झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका एसटी बसेसला बसला आहे. राज्यातील अनेक शहरांतून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन कोऱ्या बसेस आल्या होत्या. त्याही परत बोलवण्यात आल्या आहेत.

लालपरीला जाळपोळीचा धसका, नवीन स्लीपर बसेस परत बोलवल्या, कोणत्या जिल्ह्यांत काय घडले...
bus standImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 31, 2023 | 10:19 AM

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर | 31 ऑक्टोंबर 2023 : राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या या आंदोलनाची झळ एसटी बसेसला बसत आहे. पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक भागांतून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. एसटी बसेसची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये शंभरपेक्षा जास्त बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे लालपरीची सेवा ठप्प झाली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आलेल्या नवीन स्लीपर बसेस परत बोलवण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजी नगरहून निघणाऱ्या आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत.

बस स्थानकावर शुकशुकाट

छत्रपती संभाजी नगरच्या मुख्य बस स्थानकावर शुकशुकाट आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातून येणाऱ्या एसटी बसेस पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगरमधून सुटणाऱ्या बसेस देखील बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे 150 पेक्षा अधिक बसेस बस स्थानकात थांबून आहे.

पुणे शहराकडे जाणाऱ्या बसेस परत

मराठा आंदोलनाची झळ लालपरीला बसली आहे. बसेस जाळत असल्यामुळे नागपूर शहरातून पुणे शहरात जाणाऱ्या पाच स्लिपर बसेस परत बोलावल्या आहेत. या स्लिपर बसेस नवीन आहेत. जाळपोळ झाल्यास मोठे नुकसान होईल म्हणून बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. नागपूर गणेशपेठ आगारातून मराठवाड्यात गेलेल्या इतर बसेस अकोला, वाशिम, येथे थांबविल्या आहे. नागपूर डेपोच्या बसेस मराठवाड्यात जाऊ दिल्या जात नाही.

हे सुद्धा वाचा

कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती

अकोल्यातून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, पुणे, नांदेड, बीड, पंढरपूरकडे जाणाऱ्या बस फेऱ्या बंद करण्यात आल्या. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरातून मराठवाड्यासह इतर जिल्ह्यात जाणाऱ्या एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. सोलापूरमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले. पंढरपूर तालुक्यातील बंडीशेगाव येथे एसटी बस पेटवली.जळगाव आगारातून बीड आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-लासलगाव ही हिरकणी एसटी बस पुणे येथून लासलगाव येथे येत असताना मराठा आंदोलकांनी पेटवून दिली.

आंदोलकांनी बस पेटवली

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये तुरोरी येथे कर्नाटकमधून उमरग्याकडे येणारी कर्नाटकमधील एसटी बस आंदोलकांनी पेटवली. बसमधील प्रवासी उतरवून ही बस पेटवण्यात आली. कर्नाटकातील भालकीहून पुणे जाणारी ही बस होती.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.