Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी, आरक्षण मिळत नसल्याने युवकाने शेतात गळफास घेवून संपवले जीवन

maratha reservation: गेली अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी, आरक्षण मिळत नसल्याने युवकाने शेतात गळफास घेवून संपवले जीवन
Maratha Reservation
Follow us
| Updated on: Mar 17, 2025 | 4:09 PM

maratha reservation: मराठा समाजास आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात कोणत्याही युवकाने टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील वारंवार करत आहे. त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलले जात आहे. आता धाराशिवच्या कळंब तालुक्यातील देवळाली गावात 26 वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा सामाजास आरक्षण मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबियांनी सांगितले. योगेश संजय लोमटे असे त्या तरुणाचे नाव आहे.

चिठ्ठीत लिहिले जीवन संपवण्याचे कारण

योगेश संजय लोमटे यांनी गावातील शेतात जावून गळफास घेतला. त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. त्यात चिठ्ठीत मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा मजकुर लिहिला आहे. योगेश लोमटे हे उच्चशिक्षित आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते नोकरीसाठी प्रयत्न करत होते. परंतु मराठा समाजास आरक्षण नसल्याने नोकरी मिळत नसल्याने ते नैराश्यात आले. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी पंचनामा सुरु केला आहे. मराठा आरक्षणाचा विषय सुटत नसल्यामुळे तरुण नैराश्यात येत आहे. गेली अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

मागील आठवड्यात मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत दिले होते. आता यापुढे कमी सांगायचे आणि कमी बोलायचे पण आता करून दाखवायचे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले होते. आपण आपली चाल आता उघड करणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. आता धारशिव जिल्ह्यातील तरुणाने आरक्षणासाठी जीवन संपवल्यानंतर मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.