Maratha Andolan | पप्पांना खास गिफ्ट देणार, मनोज जरांगे पाटील यांच्या मुलाने सांगितलं सस्पेन्स

Maratha Andolan | मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन राज्यातील घराघरात नेले. परंतु या काळात त्यांचे कुटुंब त्यांची वाट पाहत होते. साडे पाच महिन्यांनंतर पप्पा घरी येणार आहेत. त्याचा मोठा आनंद आम्हा सर्वांना आहे, अशा भावना मुलाने व्यक्त केल्या.

Maratha Andolan | पप्पांना खास गिफ्ट देणार, मनोज जरांगे पाटील यांच्या मुलाने सांगितलं सस्पेन्स
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 1:15 PM

जालना, दि.27 जानेवारी 2024 | मराठा समाजासाठी प्राणांची बाजी लावून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. त्यानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून जल्लोष सुरु झाला. मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जल्लोषाच्या घोषणा दिल्या जात आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील त्यांच्या कुटुंबात आनंद उत्सव सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांची मुले आनंदीत झाली आहे. साडेपाच महिन्यानंतर पप्पा मिळणार असल्याचा आनंद त्यांचा मुलगा शिवराज याने व्यक्त केला. यावेळी आपण पप्पांना खास गिफ्ट देणार असल्याचे त्याने सांगितले.

काय म्हणाला शिवराज

आमच्यासाठी आजचा दिवस सणासारखा आहे. माझ्या पप्पांनी समाजासाठी काम केले. त्यांच्या आंदोलनाचे आता सार्थक झाले. त्याचा आज मला खूप आनंद होत आहे. यामुळे मी पप्पांना खास गिफ्ट देणार आहे. अर्थात माझे हे गिफ्ट हे सस्पेन्स आहे. पप्पा घरी आल्यावर मी देणार आहे. साडे पाच महिन्यांनंतर पप्पा घरी येणार आहेत. त्याचा मोठा आनंद आम्हा सर्वांना आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी घरी जाणार नाही, असा प्रतिज्ञा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. ती आता पूर्ण झाली आहे.

सर्वांच्या चेहऱ्यांवर आनंद

मुंबईत दाखल होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या. यामुळे जरांगे यांचा परिवारास कमालीचा आनंद झाला. आता कुटुंबातील सर्व सदस्य त्यांची आतूरतेने वाट पाहात आहेत. प्रत्येकाने मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी खास नियोजन केले आहे. साडे पाच महिन्यांनंतर मनोज जरांगे पाटील घरी येणार असल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.

हे सुद्धा वाचा

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आले आहे. या आंदोलना दरम्यान त्यांच्या कुटुंबियांचा त्याग महत्त्वाचा ठरला. आता मराठा समाजास आरक्षण मिळाले आहे, त्यामुळे आपल्या पप्पांनी लवकर घरी यावे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांच्या मुलगा शिवराज याने व्यक्त केली.

हे ही वाचा…

मराठा समाजासाठी 2011 पासून आंदोलन, अखेर 2024 मध्ये यश, मनोज जरांगे 14 वर्षांचा वनवास संपला

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.