महाडमध्ये भीषण आग, नवीन कंपनी उभारणी सुरु असताना रिअ‍ॅक्टर फुटले

mahad midc fire | महाड येथील एमआयडीसीमधील एका केमिकल कंपनीची उभारणीचे काम सुरु होते. यावेळी या कंपनीमधील रिअ‍ॅक्टर फुटले आणि भीषण आग लागली. या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मंत्री उदय सांमत यांनी दिली. आगीत सात कामगार जखमी झाले आहे.

महाडमध्ये भीषण आग, नवीन कंपनी उभारणी सुरु असताना रिअ‍ॅक्टर फुटले
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 8:14 AM

रवी खरात, रायगड | 4 नोव्हेंबर 2023 : महाड एमआयडीसीमध्ये ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीला शुक्रवारी भीषण आग लागली होती. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही सात कामगार बेपत्ता आहे. ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीची नव्याने उभारणी सुरु होती. या ठिकाणी असलेला अंजनी बायोटेक हा प्रकल्प दोन वर्षांपासून बंद होता. या ठिकाणी ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीची उभारणी सुरु असताना एका रिअ‍ॅक्टरमध्ये स्फोट झाला. त्यानंतर आणखी काही रिअ‍ॅक्टरमध्ये स्फोट झाला आणि आग सर्वत्र पसरली. या आगीत सुरुवातील ११ जण बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. आगीत सात जण जखमी आहे. जखमींवर रुग्णालयात उपाचार सुरु आहे. घटनास्थळी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली आहे.

पालकमंत्री मध्यरात्री घटनास्थळी

ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये सुमारे 54 कामगार कामावर होते. त्यावेळी रिअ‍ॅक्टमध्ये स्फोट झाला. तब्बल पाच तासानंतर ही आग आटोक्यात आली आहे. त्यात अकरा जण बेपत्ता झाले. महाड एमआयडीसीमध्ये ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत मध्यरात्री जाऊन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली आहे. संबंधित कंपनीच्या मालकाशी आपले बोलणे झाले आहे. तसेच या प्रकरणात योग्य ती कारवाई करा, असे निर्देश आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. एनडीआरएफच पथक हे हेलिकॉप्टरने येणार होते. मात्र हवामानात बदलामुळे एनडीआरएफचे पथक गाडीने आले. हे पथक आल्यानंतर बचाव कार्य वेगाने सुरु झाले.

रुग्णालयात यांच्यावर उपचार

आगीच्या घटनेत जखमी झालेले काही कामगार खान्देशातील आहे तर काही बिहारमधली आहे. मयूर निंबाळकर (रा. जळगाव), राहुल गिरमे (धुळे), स्वप्निल मोरे (खेड), भीमाची मुर्मू (ओडिशा), विक्रम ढेरे (भोर), उत्तम विश्वास (बिहार) आणि ज्योतू तोबा पूरम (बिहार) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत कामगारांची नावे अजून समजली नाही. दरम्यान या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.