परप्रांतियांचे परतण्यासाठी लोंढे, कसारा घाट हाऊसफुल्ल, वाहनांच्या लांबच लांब रांगा
कसारा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे (Migranant Workers Crowd at Kasara Ghat). लॉकडाऊनदरम्यान हाताशी काम नसल्यामुळे अनेक परप्रांतिय मजूर आपापल्या मुळगावाकडे परत निघाले आहेत.
नाशिक : कसारा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे (Migranant Workers Crowd at Kasara Ghat). लॉकडाऊनदरम्यान हाताशी काम नसल्यामुळे अनेक परप्रांतिय मजूर आपापल्या मुळगावाकडे परत निघाले आहेत. त्यांची प्रचंड गर्दी कसारा घाटात पाहायला मिळत आहे. यापैकी अनेक मजूर पायी चालत जात आहेत. त्यामुळे कसारा घाटात वाहनांची मोठी रांग लागली असून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे (Migranant Workers Crowd at Kasara Ghat).
कसारा घाटात पायी चालणाऱ्या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात अशा विविध राज्यांचे नागरिक आहेत. हे मजूर आपल्या संपूर्ण परिवाराला घेऊन गावाकडे निघाले आहेत. काही मजूर रिक्षा, टॅम्पो, दुचाकी किंवा मिळेल त्या गाडीने प्रवास करत आहेत. तर कित्येक मजूर पायी आपल्या गावाकडे निघाले आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असताना रस्त्यावर शेकडो मजूर पायी गावाकडे चालत जात असल्यामुळे ग्रामीण पोलिसांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. लॉकडाऊनदरम्यान स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावात सोडण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वे, ट्रेन, बसेसची सुविधा सरकारकडून केलं जात आहे. राज्य सरकार मजुरांना घरी पाठवण्यासाठी नियोजन करत आहे. भिवंडी, कल्याण, मुंबई येथून परप्रांतियांसाठी विशेष ट्रेनदेखील सोडण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे अनेक मजूर पायी आपल्या गावाकडे निघाले आहेत.
रिक्षात 12 प्रवासी
कोरोनाच्या भीतीमुळे शेकडो मजुरांनी मुळगावी जाण्याचा रस्ता धरला आहे. मजूर मिळेल त्या गाडीने जात आहेत. काही ट्रक, टेम्पोने आपापल्या गावी जात आहेत. तर काही नागरिक आपल्या लहान मुलांसह भर उन्हात रिक्षाने प्रवास करत आहेत. एका रिक्षात तब्बल 12 प्रवासी प्रवास करत आहेत. या शेकडो मजुरांमध्ये एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्यास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
सांगलीत परप्रांतियांचा हैदोस, सिगरेट न दिल्याने दुकानदाराची स्विफ्ट पेटवली, दुकानाची तोडफोड
जळगावात कोरोनाचा कहर, 157 पैकी 100 रुग्ण एकट्या अमळनेरमध्ये
काल 87, आज 96 पोलिसांना कोरोना, आतापर्यंत 714 पोलीस कोरोनाबाधित