बेपत्ता पत्नी साडेतीन वर्षांनी प्रियकरासोबत सापडली, शिर्डी पोलिसांचा धक्कादायक खुलासा

शिर्डीतील (Shirdi) महिला मिसिंग प्रकरणात शिर्डी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

बेपत्ता पत्नी साडेतीन वर्षांनी प्रियकरासोबत सापडली, शिर्डी पोलिसांचा धक्कादायक खुलासा
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 6:38 PM

शिर्डी : पोलीस (Police) तपासात कधी आणि काय समोर येईल याचा काही नेम नाही. आताही एक धक्कादायक प्रकार तब्बल 3 वर्षांनी समोर आला आहे. शिर्डीतील (Shirdi) महिला मिसिंग प्रकरणात शिर्डी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. तीन वर्षांआधी दिप्ती सोनी नावाची महिला शिर्डीमधून बेपत्ता झाल्याचं समोर आलं होतं. पण आता या महिलेचा शोध लावण्यात पोलीस पथकाला यश आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून महिलेच्या पतीला पोलिसांच्या माहितीनंतर धक्का बसला आहे. अतिरिक्त पोलीस अधिक्षक दीपाली काळे यांनी पत्रकार परिषद घेत यासंबंधि माहिती दिली आहे. (missing wife from shirdi found with her boyfriend in Indore Madhya Pradesh after three years)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिप्ती सोनी या साडेतीन वर्षांआधी शिर्डीतून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पतीकडून नोंदवण्यात आली होती. पण दिप्ती ही तिच्या प्रियकरासोबत निघून गेल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. मुळची मध्य प्रदेशच्या इंदूरची दिप्ती सोनी साडेतीन वर्षांपूर्वी शिर्डीमधून बेपत्ता झाली होती. यानंतर पती मनोज सोनीने तात्काळ उच्च न्यायालयात धाव घेत तक्रार नोंदवली होती.

यानंतर पोलीस पथकाकडून जागोजागी दिप्ती सोनीचा शोध घेण्यात आला होता. पण तिचा कुठेही पत्ता लागला नाही. यामुळे न्यायालयाने चक्क मानव तस्करी बाबत चिंता व्यक्त केली होती. पण तब्बल साडेतीन वर्षांनी मध्य प्रदेशच्या इंदूरमध्येच दीप्ती सापडली आहे. बेपत्ता पत्नी ही त्याच शहरात राहत असल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. प्रियकर ओमप्रकाश चंदेलसोबत दिप्ती निघून गेल्याचा शिर्डी पोलिसांनी खुलासा केला आहे. या बातमीमुळे सोनी कुटुंबियांच्या पायाखालची जमिन हादरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहापुर्वी दिप्ती आणि चंदेलचे प्रेमसंबध होते. पण इच्छेविरुद्ध तिचा विवाह मनोज सोनीसोबत झाला. पण प्रेमासाठी दिप्तीने पळून जाण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे मनोज सोनी यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आपली पत्नी बेपत्ता झाली म्हणून मनोज यांनी तिला शोधण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. पण आजच्या धक्कादायक माहितीनंतर सोनी कुटुंबियांना मनस्ताप झाला आहे. (missing wife from shirdi found with her boyfriend in Indore Madhya Pradesh after three years)

संबंधित बातम्या – 

लग्नाच्या मंडपात आचाऱ्याची हत्या, पोलिसांकडून दोन आरोपीना अटक

पुण्यात एअर होस्टेस तरुणीवर बलात्कार, Tinder अ‍ॅपवरून आरोपीसोबत ओळख झाली अन्….

ख्रिसमस आणि न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी मुंबईत आलेल्या मुलीवर बलात्कार, नराधमाला 12 तासांत बेड्या

(missing wife from shirdi found with her boyfriend in Indore Madhya Pradesh after three years)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.