बहुचर्चित कांदे-भुजबळ वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; प्रशासकीय कागदपत्रे मागवली

बहुचर्चित अशा कांदे-भुजबळ वादाची अखेर मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. त्यांनी प्रशासकीय कागदपत्रे मागवली असून, ते यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

बहुचर्चित कांदे-भुजबळ वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; प्रशासकीय कागदपत्रे मागवली
उद्धव ठाकरे, सुहास कांदे आणि छगन भुजबळ.
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 4:36 PM

नाशिकः बहुचर्चित अशा कांदे-भुजबळ वादाची अखेर मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. त्यांनी प्रशासकीय कागदपत्रे मागवली असून, ते यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

नियोजन समितीचा निधी विकल्याचा आरोप करत आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. ही याचिका मागे घ्यावी म्हणून आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचा आरोपही आमदार कांदे यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे कांदे यांनी याबाबत पोलिस आयुक्तांना पत्र देत तक्रार केली होती. मात्र, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांचे सारे आरोप फेटाळून लावले. या साऱ्या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आमदार कांदे आणि निकाळजे हे कुठलेही कॉल रेकॉर्डिंग सादर करण्यास असमर्थ ठरले. हा चौकशी अहवाल पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी स्वतः या दोघांची चौकशी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आमदार सुहास कांदे यांचा जबाब घेतला. काल सोमवारी अक्षय निकाळजे यांचा जबाब नोंदवण्यात आला. आता या जबाबानंतर अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. कारण आमदार कांदे यांच्याकडे आपल्याविरोधात एकही पुरावा नाही. भुजबळ यांच्याविरोधातील खटला मागे घ्यावा म्हणून मी धमकी दिल्याचे वृत्त पूर्णतः खोटे आहे. माझे कांदे यांच्याशी फोनवर बोलणे झाले, पण ते आमच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीबाबत होते. धमकीचा तर प्रश्नच येत नाही. त्यांनी केलेल्या आरोपामुळे मला भावनिक त्रास झाला. प्रतिमा खराब झाली. त्यामुळे मी कांदे यांच्याविरोधात खटला दाखल करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कांदे-निकाळजे वादावर पोलीस आयुक्तांच्या चौकशीचा निर्णय दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत प्रशासकीय कागदपत्रे मागवली आहेत. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनाही त्यांनी वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले आहे. यापूर्वी जिल्हा नियोजन समितीची बैठक न्यायलयीन प्रकरण वगळून घ्या, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा कांदे यांनी दिला आहे. शिवाय शिवसेना नेते संजय राऊत यांनी वारंवार आमदार कांदे यांची पाठराखण केली आहे. भुजबळांनी नांदगावचा नाद करायचा नाही, असा इशारा नुकताच राऊत यांनी दिला होता. त्यामुळे या साऱ्या पार्श्वभूमीवर आता प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. (MLA Suhas Kande, Guardian Minister Chhagan Bhujbal Chief Minister Uddhav Thackeray took note of the dispute, called for administrative documents)

इतर बातम्याः

साहित्य संमेलन गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख नाही; भूमिपुत्रालाच डावलल्याने नाराजीचे सूर

कोरोनाकाळात सेवा बजावणाऱ्या 983 कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान नाही; नाशिक पालिकेच्या महासभेत मुद्दा गाजणार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.