Sujat Ambedkar: ‘सुशिक्षित’ असून चालत नाही ‘सुजाण’ सुद्धा असावं लागतं, मनसे, हिंदू महासंघाचा सुजात आंबेडकरांवर निशाणा

Sujat Ambedkar: दंगल पेटवणारे हे उच्चवर्णीय उच्चवर्गीय ब्राह्मण असतात आणि रस्त्यावर उतरणारे बहुजन मुलं असतात. राज ठाकरे यांना दंगल पेटवायची असेल तर स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवा.

Sujat Ambedkar: 'सुशिक्षित' असून चालत नाही 'सुजाण' सुद्धा असावं लागतं, मनसे, हिंदू महासंघाचा सुजात आंबेडकरांवर निशाणा
मनसे, हिंदू महासंघाचा सुजात आंबेडकरांवर निशाणाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 1:38 PM

मुंबई: दंगल पेटवणारे हे उच्चवर्णीय उच्चवर्गीय ब्राह्मण असतात आणि रस्त्यावर उतरणारे बहुजन मुलं असतात. राज ठाकरे यांना दंगल पेटवायची असेल तर स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवा. स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी केला होता. सुजात यांच्या या विधानावर मनसे आणि हिंदू महासंघाने सडकून टीका केली आहे. केवळ सुशिक्षित असून चालत नाही. सुजाण सुद्धा असावं लागतं, असा हल्लाबोल मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. नावातच जात शब्द असलेल्या सुजातकडून शहाणपणाची अपेक्षा नाही, अशी टीका हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.

मनसेचे अखिल चित्रे यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. “सुशिक्षित” असून चालत नाही “सुजाण” सुद्धा असावं लागतं. अर्थात, पुढारी बनणे हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे. त्यासाठी तुम्ही फक्त उच्चशिक्षित असून चालत नाही. इतरही गुण आत्मसात करणे महत्त्वाचे. पुरोगामी महाराष्ट्रात जातिभेद, उच्च-नीच मानणारे युवक आजही आहेत हे बघून मान खाली जाते, अशी टीकाही चित्रे यांनी केली आहे.

हिंदू महासंघाची टीका काय?

नावातच जात शब्द असलेल्या सुजातकडून शहाणपणाची अपेक्षा नाही. दंगली ब्राह्मण घडवतात हे म्हणण्याआधी निदान वडिलांच मत तरी घ्यायचं होत. काल परवा राम नवमीला देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या आहेत. त्या कोणी केल्या? अफगाणिस्तानमधील बौद्ध प्रतिमेची तोडफोड कोणी केली? हिंदू धर्म रक्षण करण्यासाठी आज सुद्धा आमचा दलित बंधू काम करत आहे. हेच त्यांना सहन होत नाही ये. याच रागातून हे बोलल गेले आहे, अशी टीका हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.

राज ठाकरे एका जातीचे पुरस्कर्ते आहेत: खरात

दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) नेते सचिन खरात यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे म्हणतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करा. मग आपण जय भीम का म्हणत नाही? चैत्यभूमीला का जात नाही? हनुमान चालीसा लावायला सांगता तुमच्या मुलाला लावायला सांगा. यामुळे बहुजनांची मुले कस्टडीट आणि तुमची मुले स्टडीत हे योग्य नाही. तुम्ही निवासाचे उद्घाटन केलं त्यावेळी जाणवं दाखवत होता. त्यामुळे राज ठाकरेजी तुम्ही एका जातीचे पुरस्कर्ते आहात, तुम्ही हिंदुत्ववादी नाही, अशी टीका सचिन खरात यांनी केली आहे. ते रिपाइंच्या मेळाव्यात बोलत होते.

संबंधित बातम्या:

Sujat Ambedkar Video | दंगल पेटवायची असेल तर आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवा, सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना चॅलेंज

Sushil Kumar Shinde: यूपीएच्या अध्यक्षपदासाठी पवारांचे नाव चर्चेत, पण जागा खाली नाहीये; सुशीलकुमार शिंदेंचा टोला

Anand Dave : ‘हिंदुत्व हरले, मुस्लीम मतांची काळजी जिंकली, राज साहेब पुन्हा बदलले’

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.