AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बळीराजाच्या रेट्यापुढे हुकूमशाही वृत्तीचे मोदी सरकार झुकले; नाना पटोलेंचा हल्लाबोल

पटोले म्हणाले की, मोदींना शेतक-यांचा खरा कळवळा असता तर लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा टेनी यांच्या मुलाने शेतक-यांना गाडीखाली चिरडून मारले. त्या अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी केली असती.

बळीराजाच्या रेट्यापुढे हुकूमशाही वृत्तीचे मोदी सरकार झुकले; नाना पटोलेंचा हल्लाबोल
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 3:04 PM
Share

मुंबईः उत्तर प्रदेशासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची भीती, देशातील बळीराजच्या आंदोलनाचा रेटा व जनमताचा प्रचंड विरोधापुढे केंद्रातील भाजपा सरकारला झुकावे लागले. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणलेले तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करावी लागली. हा देशातील शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय असून अहंकारी हुकूमशाही वृत्तीच्या मोदी सरकारचा पराभव झाला आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

गुलाम बनवणारे कायदे

केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, मोदी सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे देशाताली शेतकऱ्यांना भांडवलदाराचे गुलाम बनवणारे होते. एमएसपीचे प्रावधान या कायद्यात नव्हते. तसेच शेतकऱ्यांच्या हक्काच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या संपुष्टात येऊन ही बाजारपेठही खासगी व्यापाऱ्यांच्या घशात घालणारे कायदे होते. हे काळे कायदे रद्द करावेत म्हणून देशभरातील बळीराजाने आंदोलन छेडले. या आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेस पक्ष पहिल्यादिवसापासून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला. महाराष्ट्रातही काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून विविध आंदोलने करून काळे कायदे रद्द करावेत अशी मागणी केली होती. तसेच प्रदेश काँग्रेसने ६० लाख शेतक-यांच्या सह्यांचे निवदेन राष्ट्रपतींना पाठवले होते.

शेतकऱ्यांवर अत्याचार केला

पटोलो म्हणाले की, एक वर्षापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी ठाण मांडून बसेल आहेत, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या शेतकऱ्यांना एकदाही भेटण्यास वेळ मिळाला नाही. या शेतकऱ्यांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. जवळपास 700 शेतकऱ्यांनी या आंदोलनादरम्यान प्राण गमावले. दिल्लीत येऊ नये म्हणून रस्त्यावर खिळे ठोकले, भिंती उभ्या केल्या, कडाक्याच्या थंडीत त्यांच्यावर थंड पाण्याचा मारा केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खलिस्तानी, नक्षलवादी, आंदोलजीवी म्हणून भाजपाने हिणवले. मात्र, शेतकरी मागे हटला नाही. आजचा निर्णय हा या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा, देशातील जनतेच्या निर्धाराचा आहे. एकजुटीने लढा दिल्यास सत्ताधारी कितीही शक्तीशाली असले तरी त्यांना झुकावेच लागते हे आज बळीराजाने दाखवून दिले आहे.

पराभव पाहून निर्णय

पटोले म्हणाले की, केंद्र सरकारच्या आजच्या निर्णयामागे उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव दिसू लागला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाची देशभर प्रचंड पिछेहाट झाली. जनमत भाजपच्या विरोधात आहे. या पराभवानंतर केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी केल्या. उत्तर प्रदेशात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव निश्चित आहे. शेतकऱ्यांची नाराजी परवडणारी नाही हे लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकारला कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

मंत्रिमंडळातून हकालपट्टी का नाही?

पटोले म्हणाले की, हा निर्णय शेतक-यांच्या हितासाठी नाही, तर पराभवाच्या भीतीने घेतला आहे. मोदींना शेतक-यांचा खरा कळवळा असता तर लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा टेनी यांच्या मुलाने शेतक-यांना गाडीखाली चिरडून मारले. त्या अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी केली असती. मात्र, त्यांनी अद्याप तसे केले नाही. या लढ्यात शेतक-यांचा विजय झाला आहे, पण हमी भाव आणि शेतक-यांच्या इतर प्रश्नांवरील आमचा लढा सुरूच राहील. मोदींची कार्यपद्धती पाहता ते निवडणुका झाल्यावर पुन्हा असे कायदे आणू शकतात. त्यासाठी आपण सर्वांनी सजग राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

इतर बातम्याः

कृषी कायदे लवकर मागे घेतले असते, तर हजारो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते; भुजबळांचे मोदींवर शरसंधाण

महाराष्ट्र, बंगाल अन् केरळ सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न; शरद पवारांचा गंभीर आरोप

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.