आमच्याकडे वडापाव खाणारा जिंकूनच येणार… प्रसिद्ध वडापाववाल्या चाचांचे भाकीत

ansar chacha vadapav: खासदार लोखंडे यांनी अन्सार चाचांचा हात हातात घेत त्यांचा फेमस डायलॉग .."खाता की नेता" म्हणताच उपस्थितांसह अन्सार चाचा देखील खळखळून हसले. ते उत्तरात म्हणाले... "पहिले खाता अन् मग नेता" नेत्या समोर खाता आणि नेता असे यमक योगायोगाने जुळल्याने अन्सार चाचांना हसू आवरले नाही.

आमच्याकडे वडापाव खाणारा जिंकूनच येणार... प्रसिद्ध वडापाववाल्या चाचांचे भाकीत
सदाशिव लोखंडे अन् अन्सार चाचा
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 2:32 PM

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार जोमाने प्रचाराला लागले आहेत. प्रचारासाठी उमेदवारांना दिवस रात्र कमी पडत आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या प्रचारासाठी नवनवीन फंडे शोधत आहेत. शिर्डी लोकसभेचे महायुतीची उमेदवार सदाशिव लोखंडे संगमनेर तालुका दौऱ्यावर आहे. संगमनेरला गेल्यावर प्रसिद्ध अन्सार चाचा यांच्या वडापावच्या दुकानात वडा खान्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. यावेळी चाचांनी नेहमीच्या आपल्या शैलीने त्यांचे स्वागत केले. त्यांचा प्रसिद्ध डॉयलॉग “खाता की नेता” हा वापरला. तसेच आमच्याकडे वडा खाणारा निवडूनच येणार? अशा अनोख्या शुभेच्छाही दिल्या.

अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात आणि देशभरात आपल्या विशिष्ठ शैलीने अन्सार चाचा प्रसिद्ध आहे. ग्राहकांशी प्रेमाने बोलण्याबरोबर अतिशय चविष्ट वडापावसाठी त्यांचे समनापूर ओळखले जाते. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी अन्सार चाचा यांच्या नशीब वडापाव येथे भेट दिली. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांना वडापाव खाण्याचा मोह आवरला नाही. खासदारांचा ताफा अचानक अन्सार चाचांच्या दुकानासमोर थांबताच अन्सार चाचांनी देखील दुकानातून बाहेर येत खा.लोखंडे यांचे स्वागत केले.

चाचा म्हणाले, “खाता की नेता”

खासदार लोखंडे यांनी अन्सार चाचांचा हात हातात घेत त्यांचा फेमस डायलॉग ..”खाता की नेता” म्हणताच उपस्थितांसह अन्सार चाचा देखील खळखळून हसले. ते उत्तरात म्हणाले… “पहिले खाता अन् मग नेता” नेत्या समोर खाता आणि नेता असे यमक योगायोगाने जुळल्याने अन्सार चाचांना हसू आवरले नाही. त्यानंतर चाचांनी सदाशिव लोखंडे यांच्या सह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वडापाव खाण्याचा आग्रह केला. चाचांनी स्वतः आपल्या हाताने खासदारांना वडापाव देखील खाऊ घातला.

हे सुद्धा वाचा

100 टक्के निवडूनच येता

यावेळी अन्सार चाचांनी आपली प्रतिक्रिया देताना पुन्हा नवीन डायलॉगला जन्म देत म्हणाले “आमच्याकडे जे वडे खाता,ते 100 टक्के निवडूनच येता” असे म्हणत खासदार साहेब आज माझ्या दुकानात आले आणि त्यांनी वडापाव सुद्धा खाल्ला मला फार आनंद झाल्याचे सांगत त्यांनी विजयासाठी खासदार लोखंडे यांना शुभेच्छा दिल्या.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....