Aashish Shelar | बांद्रा येथील कोट्यवधी किंमतीची जागा रुस्तुमजी डेव्हलपर्सला कवडीमोल भावात विकली, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप!

अल्पसंख्याक समाजाच्या सरकारी जागा याच्यावर भ्रष्टाचाराचं कुरण कसं वाढतंय याचं प्रकरण आहे. पंचतारांकित विभागात ज्या भागात जमिनीचे भाव प्रचंड आहेत, अशा ठिकाणच्या सरकारी मालकीच्या जागा कवडीमोल किमंतीला देण्याचा सरकारी कार्यक्रम ठाकरे सरकारमध्ये पहिल्यांदाच पाहतोय, असं वक्तव्यही आशिष शेलार यांनी केलंय.

Aashish Shelar | बांद्रा येथील कोट्यवधी किंमतीची जागा रुस्तुमजी डेव्हलपर्सला कवडीमोल भावात विकली, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 1:25 PM

मुंबईः महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने (Thackeray Government) बांद्रा पश्चिम भागातील पंचतारांकित जागा रुस्तुमजी नावाच्या विकासकाला कवडीमोल भावात विकल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी केला आहे. बांद्रा येथील ऐतिहासिक वारसा समजली कोट्यवधी किंमतीची जागा विकासकाला (Rustumji Developers) कमी किंमतीत विकण्याची परवानगी महसूल विभागाने, धर्मादाय आयुक्तांनी दिलीच कशी? यामागे कोणत्या मंत्र्यांचे लागेबांधे आहेत, याचा तपास लागला पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. अल्पसंख्याक समाजाच्या सरकारी जागा याच्यावर भ्रष्टाचाराचं कुरण कसं वाढतंय याचं प्रकरण आहे. पंचतारांकित विभागात ज्या भागात जमिनीचे भाव प्रचंड आहेत, अशा ठिकाणच्या सरकारी मालकीच्या जागा कवडीमोल किमंतीला देण्याचा सरकारी कार्यक्रम ठाकरे सरकारमध्ये पहिल्यांदाच पाहतोय, असं वक्तव्यही आशिष शेलार यांनी केलंय. महाविकास आघाडी सरकारला याचं उत्तर द्यावंच लागेल, असंही आशिष शेलार म्हणाले.

आशिष शेलार काय म्हणाले?

कोट्यवधी किंमतीची जागा मुंबईतील एका विकासकाला कवडीमोल भावात विकल्याचा आरोप करताना आशिष शेलार म्हणाले, ‘ जे बांधकाम सरकारी जागेवर आहे. जे हेरिटेज डिक्लेअर आहे. अशा जागा मुंबईतल्या विकल्या जात आहेत. हेसुद्धा गंभीर आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिम वांद्रेतील बॅन्ड स्टॅंडजवळ उच्च प्रतीच्या आणि उच्च दराच्या जागा असलेल्या भागात बांद्रा ताजलँड सनच्या बाजूला महाराष्ट्र सराकरच्या मालकीची पाच हजार 81 स्क्वेअर यार्ड – 1 एकर पाच गुंठे .. समुद्र किनारीची ही जागा भाडेपट्ट्यावर लीजवर 1905 पासून बांद्रा पारसी होम फॉर वुमन चॅरिटेबल ट्रस्ट या एका ट्रस्टला दिली गेली होती. ज्या ट्रस्टचं लीज भाडेपट्टा 1980 लाच संपला. अशी मोक्याची जागा त्यावेळेला सरकारने समाजातील आजारी पडलेल्या लोकांना बरं होण्यासाठी विश्रांतीची जागा या उपयोगासाठी चॅरिटेबलला ट्रस्टला दिली होती. रुग्णांना विश्रांतीसाठी या हेतूसाठी ही जागा दिली होती. ज्यावर 2034 च्या विकास आराखड्याप्रमाणे रिहॅबिटेशन सेंटर असं आरक्षण टाकण्यात आलं. ती जागा राज्य सरकारच्या महसूल खात्याअंतर्गत असतानाही भाडे पट्टा लीज करार संपलेला असतानाही एका इमेरिअल इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच रुस्तमजी नावाच्या विकासकाला कवडीमोल दराने विकण्याचा घाट आणि कट सरकारच्या खात्याअंतर्गत घातला गेला. ती विकण्यातसुद्धा आली, असा आरोप आशिष शेलार यांनी केला.

डेव्हलपरला 1 हजार3 कोटी रुपयांचा

सरकारने ज्या विकासकाला जागा विकली, त्याला 01 हजार 03 कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचं आशिष शेलार यांनी स्पष्ट आरोप केला. ते म्हणाले, ‘ ज्या जागेत नेट प्रॉफिट फायदा, महापालिका धोरणानुसार, देय जे बांधकाम मंजूर केलं जाईल या सगळ्याची जर किंतम बघितली तर सगळे खर्च व्याजासहित काढल्यानंतर निव्वळ फायदा रुस्तमजी नावाच्या बिल्डरला 1 हजार 03 कोटी रुपयांचा होणार आहे. या भूखंडाला केवळ 234 कोटी रुपयात विकण्याच्या सगळ्या परवानग्या त्या ट्रस्टला आणि कलेक्टरने महसूल खात्याच्या मार्फत दिल्या गेल्या. या रुस्तमजी विकासकाचे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधल्या कोणत्या मंत्र्यांशी लागेबांधे आहेत, असा सवाल आशिष शेलार यांनी केला. गरीब रुग्णांच्या विश्रांतीसाठी 12 हजार स्क्वेअरफूट सरकारी जागा दिली गोली. विकासकाला १ लाख ९० हजार फूट संपूर्ण मालकीवर दिली गेली. असा निर्णय जो केला गेला.असंही आशिष शेलार म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.