Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचा विस्फोट, दिवसभरात 15 हजारापेक्षा अधिक रुग्ण, तिघांचा मृत्यू
राजधानी मुंबईत (Mumbai) तर आज कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळाला. मुंबईत आज तब्बल 15 हजार 166 नवे रुग्ण (Corona Patient) आढळून आले आहेत. तर तिन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव (Corona Outbreak) आता अधिक चिंताजनक बनत आले. राजधानी मुंबईत (Mumbai) तर आज कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळाला. मुंबईत आज तब्बल 15 हजार 166 नवे रुग्ण (Corona Patient) आढळून आले आहेत. तर तिन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला 20 हजाराच्या पुढे गेली तर लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबईची वाटचाल आता लॉकडाऊनच्या दिशेनं सुरु आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
मुंबई महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज 15 हजार 166 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 13 हजार 195 रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत. तर आज 1 हजार 218 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज दिवसभरात 714 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आलीय.
#CoronavirusUpdates ५ जानेवारी, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण- १५१६६
२४ तासात बरे झालेले रुग्ण-७१४
बरे झालेले एकूण रुग्ण-७५२७२६ बरे झालेल्या रुग्णांचा दर-९०%
एकूण सक्रिय रुग्ण- ६१९२३
दुप्पटीचा दर-८९ दिवस कोविड वाढीचा दर (२९ डिसेंबर- ४ जानेवारी)-०.७८%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 5, 2022
मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 90 टक्के आहे. 29 डिसेंबर 2021 ते 4 जानेवारी 2022 पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.78 टक्के आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर 89 दिवसांवर आहे. मुंबईत सक्रिय कंटेन्मेंट झोन 20 आहेत. तर मुंबईतील 462 इमारती सीलबंद आहेत, अशी माहिती महापालिकेनं दिली आहे.
#CoronavirusUpdates ५ जानेवारी, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/cnjawtZKlx
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 5, 2022
मुंबईत कोविड लसीच्या पहिल्या मात्रेचा एक कोटीचा टप्पा पूर्ण
कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम अंतर्गत, पात्र व्यक्तिंना मिळून 1 कोटी पहिल्या मात्रा देण्याचा महत्त्वाचा टप्पा मुंबई महानगराने गाठला आहे. या कामगिरीमध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे. राष्ट्रीय स्तरावरील कोविड लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती होण्याच्या आतच विक्रमी वेळेत मुंबईने ही कामगिरी बजावली आहे. मुंबईत आजवर कोविड लसीची पहिली आणि दुसरी अशा दोन्ही मात्रा मिळून सुमारे 1 कोटी 81 लाखांपेक्षा अधिक लशी देण्यात आल्या आहेत. एकूण दोन कोटी मात्रांचा टप्पा गाठण्याकडे मुंबईची वेगाने वाटचाल सुरु आहे.
कोविड – १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम अंतर्गत, पात्र व्यक्तिंना मिळून १ कोटी पहिल्या मात्रा देण्याचा महत्त्वाचा टप्पा मुंबई महानगराने गाठला आहे.
मुंबईत आजवर कोविड लसीची पहिली आणि दुसरी अशा दोन्ही मात्रा मिळून सुमारे १ कोटी ८१ लाखांपेक्षा अधिक लशी देण्यात आल्या आहेत. pic.twitter.com/jxb7ZEUGjW
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 5, 2022
इतर बातम्या :