Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत बंदमुळे राज्यात 5 बाजार समित्या बंद, या जिल्ह्यांचा आहे समावेश

तकऱ्यांच्या देशव्यापी संपात व्यापारी आणि माथाडी कामगार सहभागी होणार असा संबंधित बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

भारत बंदमुळे राज्यात 5 बाजार समित्या बंद, या जिल्ह्यांचा आहे समावेश
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 1:56 PM

नवी मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याविरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार व व्यापा-यांचा मंगळवार (08 डिसेंबर) रोजी संप असणार आहे. इतकंच नाही तर उद्या भारत बंदमध्ये मुंबई, नवी मुंबई, तुर्भे इथल्या 5 बाजार समित्या बंद असणार असून पुणे, नाशिक एपीएमसी, यवतमाळ जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (Mumbai Navi Mumbai Turbhe 5 market committees will be closed on bharat bandh)

शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपात व्यापारी आणि माथाडी कामगार सहभागी होणार असा संबंधित बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत माथाडी नेते नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व बाजारसमितीच्या संचालक उपस्थित होते.

केंद्र सरकारने कृषी व पणन कायद्यात केलेल्या बदलामुळे आणि नवीन कायदे केल्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील व्यापाऱ्यांचा व्यवसाय आणि कष्टाची कामे करणाऱ्या माथाडी कामगारांची कामं कमी झाल्यामुळे या घटकांवर आणि शेतकऱ्यांवर बेकारीचं संकट ओढवलं आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप आणि व्यापारी असोसिएशनने पदाधिकारी व बाजारसमीतिचे संचालक यांनी संपाचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये आशिया खंडातील मोठा बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे धान्य, मसाला, फळ, भाजीपाला व कांदा बटाटा मार्केट बंद राहणार असून राज्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिक, पुणे बाजारपेठ बंद राहणार अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.

राज्यातील विविध कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात व्यापारी वर्ग व्यापार करतात. माथाडी कामगार कष्टांची कामे करतात. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील घटकांचा केंद्र सरकारने विचार करावा, या घटकांचे नुकसान होऊ नये म्हणून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. राज्यातील सर्व बाजार समितीच्या आवारातील व्यापारी, माथाडी कामगार, शेतकरी व अन्य घटकांनी दिनांक 8 डिसेंबर रोजीच्या देशव्यापी संपात सहभागी व्हावं, असं आवाहन माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केलं आहे. (Mumbai Navi Mumbai Turbhe 5 market committees will be closed on bharat bandh)

इतर बातम्या – 

शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी हा बंद पाळा, संजय राऊतांचं आवाहन

Farmers protest: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्या बंद; माथाडी कामगारही संपावर

(Mumbai Navi Mumbai Turbhe 5 market committees will be closed on bharat bandh)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.