Ravi Rana | ‘हनुमान चालीसा’ म्हणण्याऐवजी ‘विकासाची संजीवनी’ लोकांपर्यंत पोचवा, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांचा सल्ला

मुंबईः भाजपचे लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी नको ते उद्योग करत आहेत त्यातच भाजप खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम घेतला आहे. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणण्याऐवजी विकासाची संजीवनी लोकांपर्यंत पोचवा अशी जोरदार टीका महेश तपासे यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत […]

Ravi Rana | 'हनुमान चालीसा' म्हणण्याऐवजी 'विकासाची संजीवनी' लोकांपर्यंत पोचवा, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांचा सल्ला
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 5:25 PM

मुंबईः भाजपचे लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी नको ते उद्योग करत आहेत त्यातच भाजप खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम घेतला आहे. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणण्याऐवजी विकासाची संजीवनी लोकांपर्यंत पोचवा अशी जोरदार टीका महेश तपासे यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे ठरवले आहे. यावर प्रतिक्रिया देताना महेश तपासे यांनी हा सल्ला दिला.

‘ महत्त्वाच्या प्रश्नांवर भाजपला बोलायचं नाही’

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, ‘ राज्यातील व देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलायचं नाही… तर दुसरीकडे जातीय तेढ निर्माण करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपचे लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र हे सरकार अस्थिर होणार नाही तर ते अधिक भक्कम होईल असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. मुळात लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात विकासकामे व त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यायचा असतो. मात्र भाजपच्या विचाराने प्रेरित लोकप्रतिनिधींना जनतेच्या विकासकामांमध्ये रस नाही. त्यांना राज्यातील सरकार अस्थिर कसं होईल, धार्मिक व जातीय तेढ कशी निर्माण करता येईल यामध्ये जास्त रस आहे असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

हनुमान चालीसा म्हणणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे का?

मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचे भाजप खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी जाहीर केले होते. वास्तविक हे लोकप्रतिनिधींचे काम आहे का? असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे. वीजनिर्मितीसाठी लागणार्‍या कोळशाचे संकट देशातील सात ते आठ राज्यात आहे त्यात महाराष्ट्र आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी अतिरिक्त कोळसा मिळावा यासाठी आणि महागाईवर पंतप्रधानांवर दबाव आणायला हवा होता. कोळशाचे व वाढत्या महागाईचे नियोजन मोदी सरकारने का केले नाही याची विचारणा करायला हवी होती मात्र दुर्दैवाने भाजपचे लोकप्रतिनिधी हेच प्रश्न विचारताना दिसत नाहीत असेही महेश तपासे म्हणाले.

इतर बातम्या-

Ajit Pawar On Hospital Bill : हे बघ, माझं बिल मी दिलं, मंत्र्यांच्या ‘उपचार लुटी’वर अजित पवारांचा आवाज चढला

Uddhav Thackeray : राणा दाम्पत्याचा इशारा, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ‘मातोश्री’वर दाखल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.