AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनजमिनीवरील चाळींचं सर्वेक्षण करा, मालवणी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकरांची मागणी

मालवणी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वनजमिनीवरील चाळींचं सर्वेक्षण करा आणि दुर्घटना टाळा असं आवाहन दरेकर यांनी ठाकरे सरकारकडं केलंय.

वनजमिनीवरील चाळींचं सर्वेक्षण करा, मालवणी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकरांची मागणी
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 3:20 PM
Share

मुंबई : पहिल्याच मुसळधार पावसामुळे मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागातील इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर दहरिसर परिसरातही 3 घरं कोसळली. त्यात एकाचा मृत्यू झालाय. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारकडे महत्वाची मागणी केलीय. मालवणी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वनजमिनीवरील चाळींचं सर्वेक्षण करा आणि दुर्घटना टाळा असं आवाहन दरेकर यांनी ठाकरे सरकारकडं केलंय. (Praveen Darekar’s demand for survey of houses on forest land to prevent accidents)

वनजमिनींवरील चाळींमधील घरांची डागडुजी करण्याची गरज आहे. मालवणीसारखी दुर्घटना टाळायची असेल तर या घरांच्या डागडुजीसाठी पारवानगी द्यावी या मागणीसाठी प्रवीण दरेकर यांनी आज वनसंरक्षकांची भेट घेतली. जर अतिधोकादायक घरं असतील तर त्या ठिकाणच्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी नेण्यात यावं, अशी मागणी दरेकर यांनी राज्य सरकारकडे केलीय. तसंच वनजमिनीवरील चाळींचं सर्वेक्षण व्हावं आणि दुर्घटना टाळाव्या, असंही दरेकर म्हणाले.

हे सरकार हिंदुत्व विरोधी- दरेकर

आषाढी वारीला यंदाही बसमधून परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हे सरकार हिंदुत्व विरोधी असल्याचा गंभीर आरोप दरेकर यांनी केला आहे. सर्व गोष्टी अनलॉक होत आहे. असं असताना मंदिरं बंद का? असा सवालही दरेकरांनी केलाय. पायी चालत जाऊन होते त्यालाच वारी म्हणतात. अजित पवारांना उशिराजरी शहाणपण सुचलं तरी त्याचं आम्ही स्वागत करु, असा टोलाही दरेकर यांनी अजितदादांना लगावलाय.

‘वरातीमागून घोडे नाचवणं बंद करा, मुंबईकरांची चेष्टा थांबवा’

9 जून रोजी झालेल्या पहिल्याच पावसामुळे मुंबईकरांची दैना उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. हिंदमाता आणि सायन सर्कलसह अनेक भागात रस्त्यांवर, रस्त्यांच्या बाजूला असलेल्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यावेळी दरेकरांनी रस्त्यावर उतरुन पाहणी केली होती. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं. यात महापालिकेचा निष्क्रियपणा दिसून येतोय. हायटाईड आणि पाऊस हा मुंबईकरांना वर्षोनुवर्षे माहिती आहे. पण गेल्या वर्षभरात जे नियोजन करायला हवं होतं ते झालं नाही. त्यामुळे पुरता बट्ट्याबोळ झालाय. आता तरी शहाणं व्हावं. सत्ताधाऱ्यांनी वरातीमागून घोडे नाचवणं बंद करावं. येणाऱ्या 8 ते 10 दिवसांत पूर्ण यंत्रणा कामी लावून पावसावर लक्ष केंद्रीत करावं अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली होती.

संबंधित बातम्या :

नवी मुंबईतील इतिहासाचा साक्षीदार असलेली वास्तू कोसळली, बेलापूर किल्ल्याचा बुरुज ढासळला

Mumbai Rains: मुंबईत समुद्राला उधाण, ढगांचा गडगडाट, धो-धो पावसाला सुरुवात

Praveen Darekar’s demand for survey of houses on forest land to prevent accidents

नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.