Navneet Rana : पेडणेकर, कायंदेंनी नवनीत राणांना MRI वरून उघडं पाडलं? शिवसेनेच्या या 20 प्रश्नांवर लिलावतीही निरुत्तर झाले?

लिलावती रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत पेडणेकर आणि मनिषा कायंदेंनी नवनीत राणांना एमआयआरवरून अक्षरशः उघडं पाडलं. राणांचा एमआरआय झाला की नाही? या मूळ प्रश्नापासूनच शिवसेनेच्या प्रश्नांना सुरुवात झाली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनावर अनेक प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. गंभीर बाब म्हणजे या प्रश्नांची उत्तरं देताना रुग्णालय प्रशासनाची भंबेरी उडाली.

Navneet Rana : पेडणेकर, कायंदेंनी नवनीत राणांना MRI वरून उघडं पाडलं? शिवसेनेच्या या 20 प्रश्नांवर लिलावतीही निरुत्तर झाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 1:49 PM

इकडे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) शिवसेना नेत्यांच्या तक्रारीसाठी दिल्लीकडे रवाना झाले आणि शिवसेना नेत्यांनी लिलावतीकडे (Lilavati hospital) धाव घेतली. लिलावती रुग्णालयात रविवारी नवनीत राणा यांचं MRI झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. थेट एमआरआय मशीनवर गेलेली व्यक्ती अशा प्रकारे मान उचलून काय बघते? त्या तपासणी रुममध्ये कुणीतरी त्याचा व्हिडिओ काय काढतो? आणि एमआरआय झालेली व्यक्ती, मानेच्या दुखण्याने त्रस्त असलेल्या नवनीत राणा लिलावतीच्या बाहेर येऊन माध्यमांना एवढी सविस्तर प्रतिक्रिया देतात. कित्येक तास माध्यमांसमोर बोलत राहतात, हे कसं होऊ शकतं? या प्रश्नांची पोतडी घेऊन शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि आमदार मनिषा कायंदे आज लिलावती रुग्णालयात पोहोचल्या. लिलावती रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत पेडणेकर आणि मनिषा कायंदेंनी नवनीत राणांना एमआयआरवरून अक्षरशः उघडं पाडलं. राणांचा एमआरआय झाला की नाही? या मूळ प्रश्नापासूनच शिवसेनेच्या प्रश्नांना सुरुवात झाली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनावर अनेक प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. गंभीर बाब म्हणजे या प्रश्नांची उत्तरं देताना रुग्णालय प्रशासनाची भंबेरी उडाली.

शिवसेनेने उपस्थित केलेले 20 प्रश्न कोणते?

  1.  नवनीत राणांचा MRI दरम्यानचे फोटो कसे बाहेर आले?
  2.  MRI रुममध्ये रुग्ण आणि डॉक्टरांशिवाय इतर कुणालाही जाण्याची परवानगी नसते, तिथं इतके लोक का?
  3. ही रुम निर्जंतुक असणं गरजेची असते, तरीही बाहेरचा व्यक्ती आत कसा?
  4. MRI मशीनजवळ कुठलाही धातू वा इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास परवानगी नसते, तरीही मोबाईलने फोटो कसे क्लिक केले?
  5. नवनीत राणांचा MRI सुरु असताना फोटो काढले, त्यावेळी अपघात झाला असता तर त्याला जबाबदार कोण?
  6.  फोटो काढताना MRI मशीन बंद नव्हती कशावरुन? फक्त फोटोसेशनसाठीच नवनीत राणा तिथं गेल्या नसतील हे कशावरुन?
  7. लिलावतीत नातेवाईकांनाही जाताना अनेक निर्बंध लावले जातात, मात्र इथं सर्रास सगळं कसं सुरु होतं?
  8.  MRI सुरु असताना सगळे लांब असतात, इथं सगळे जवळ कसे उभे दिसतात?
  9.  नवनीत राणांचा MRI रिपोर्ट अद्याप कसा आला नाही?
  10. नवनीत राणा घाबरल्या होत्या, तर त्यांचे पाय का बांधण्यात आले नाहीत?
  11. पोटाचा MRI काढला गेला असेल, तर त्यांच्या पोटाला बेल्ट का नव्हता?
  12. नवनीत राणांना जर मानही उचलत नव्हती, तर त्या लगेच बाहेर येऊन कशा बोलल्या?
  13. स्पॉन्डिलीसीसाठी खरंच MRI ची गरज होती का?
  14.  मानदुखीचा त्रास होत असेल, तर नवनीत राणांना उशी कशी दिली?
  15. राणांचे फोटो बाहेर आल्यानंतरही लिलावतीत दोषींची चौकशी का झाली नाही?
  16.  MRI वेळी रुग्णालयाचे सिक्युरिटी हेडही रुमध्ये होते, मग हे कसं घडू दिलं?
  17.  लिलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांनी घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं, त्यांच्यावर कारवाई का होऊ नये?
  18. बाहेरचा व्यक्ती फोटो काढत होता, तेव्हा त्याला बाहेर का काढलं नाही?
  19. फोटो काढल्याचं लक्ष्यात आल्यानंतर, त्याचा मोबाईल का नाही घेतला?
  20. जो पॅरामेडिक स्टाफ MRI करत होता, तो आता हजर का नाही?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.