VIDEO: मुख्यमंत्र्यांचं पत्रं ते राऊतांची आक्षेपार्ह भाषा, सोमय्यांचं रोखठोक उत्तर; पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे काय?
किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या प्रत्येक आरोपांना उत्तर देतानाच राऊत, रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पत्रेच पत्रकार परिषदेत वाचून दाखवले. त्यानंतर चिटींग कोण करत आहे? फोर्जरी कोण करत आहे? असा सवालच सोमय्या यांनी केला आहे.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पत्र लिहून भ्रष्टाचार विरोधी लढ्याचं केलेलं कौतुक, भ्रष्टाचार उघड केला म्हणून मुख्यमंत्र्यांकडून झालेली हेटाळणी, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं पत्रं, रश्मी ठाकरे यांनी कोर्लईच्या संरपंचांना दोन पत्रं लिहून आधी बंगल्यावर दावा करणं आणि नंतर बंगल्याचं नाकारलेलं अस्तित्व आणि राऊतांनी वापरलेली भाषा आदी मुद्द्यांवरून आज भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या प्रत्येक आरोपांना उत्तर देतानाच राऊत, रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पत्रेच पत्रकार परिषदेत वाचून दाखवले. त्यानंतर चिटींग कोण करत आहे? फोर्जरी कोण करत आहे? असा सवालच सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना (shivsena) आता त्याला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत नेमके काय मुद्दे उपस्थित केले. त्यावर टाकलेला हा प्रकाश.
- संजय राऊतांनी मला पत्र लिहिलं होतं. 11 ऑक्टोबर 2021 रोजी हे पत्रं राऊतांनी लिहिलं होतं. प्रिय श्री किरीट सोमय्याजी, जय महाराष्ट्र. भ्रष्टाचार आणि शासकीय पैशाचा अपहार आदी अनेक प्रकरणे आपण उघड केले. हे राष्ट्रावर उपकार झाले. त्यामुळे अनेकांना तुरुंगात जावं लागले. भ्रष्टाचार विरोधातील आपल्या लढ्याला बळ मिळावं, असं राऊत यांनी या पत्रात म्हटलं आहे. राऊत कौतुक करतात आणि मुख्यमंत्र्यांपासून इतर लोक म्हणतात सोमय्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करा.
- 19 बंगल्याच्या प्रकरणावर सरपंच बोलतात, उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? बायकोची बाजू घ्यायची नाही?, असा सवाल त्यांनी केला. 23 मे 2019 आणि जानेवारी 2019 रोजी रश्मी ठाकरेंनी कोर्लईच्या सरपंचांना पत्र लिहिलं होतं. आम्ही 30 एप्रिल 2014 रोजी जमीन मालक अन्वय मधुकर नाईक यांच्या जागा खरेदी केल्या असून यातील असेसटमेंट क्रमांक 787 ते 779 आणि 801 ते 805 हे घर आमच्या नावे केल्यास मी आपले ऋणी राहणार, असं रश्मी ठाकरे आणि मनिषा रवींद्र वायकर यांनी पत्रात नमूद केलं होतं. त्यावर सरपंचाची रिसीव्ह म्हणून सही आहे. मी हे पत्रं ग्रामपंचायतीतूनच नाही तर चारही ठिकाणी आरटीआयमधून मी माहिती मिळवली आहे.
- 2 फेब्रुवारी 2019 रोजीही रश्मी ठाकरेंनी सरपंचांना पत्रं लिहिलं होतं. ही मिळकत आम्ही अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी विक्री खताद्वारे विकत घेतली आहे. आम्ही मिळकत खरेदी केली तेव्हा कोणतेही बंगले अथवा घरे नव्हती, असं रश्मी ठाकरे म्हणाल्या होत्या. त्यामुळे फोर्जरी कोण करत आहे. चिटींग कोण करत आहे? जनतेची फसवणूक कोण करत आहे? बंगले नाही सांगत सोमय्याला जोड्याला मारणार असं तुम्ही म्हणता हे पत्रं काय आहे? असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री यावर का बोलत नाही? कुणाहीमध्ये त्यावर बोलण्याची हिंमत नाही.
- जोडे मारण्याची भाषा दलालपासून भXXXची भाषा. राऊतांना भXXXचा अर्थ कळतो का, माझ्या बायकोला आणि आईला जाऊन विचार. माझी बायको मराठी आहे. बायकोचं आडनाव ओक आहे. माझी सून मराठी आहे, बागायतकर. त्यांना जाऊन विचारा. राऊत त्यांची चोरी, लबाडी उघड होतेय म्हणून अशी भाषा करतायत का?
- ईडी ऑफिसरने माझ्या प्रकल्पात पैसे दिल्याचा आरोप केला. मी विचारतोय, कुठल्या अधिकाऱ्याला दिले? त्या अधिकाऱ्याबद्दल मी तक्रार दाखल करतो. पालघरच नाव घेतलं, पालघरच्या जमीनचं व्हॅल्युएशन ठाकरेंच्या कलेक्टरने केलंय. तिथून बुलेट ट्रेन जाते, 15 कोटीचं व्हॅल्युएशन, 260 कोटींचं ईडीचं इन्व्हेस्टमेंट?
- ईडीच्या कार्यालयावर दोन ट्रक पेपर घेऊन जाणार असं ते म्हणाले. काय सेन्शेशन करता? 7500 कोटी अमित शाहा, फडणवीस यांना दिले असं ते म्हणतात. शरद पवार सीनिअर मिनिस्टर आहेत, राज्य सरकारने तक्रार रजिस्टर करायची असते, मग ईडीकडे जायचं असतं. पोलिसांनी याआधी कचरा वाटला म्हणून तक्रार केली नाही?
- किरीट रोज रोज उत्तर देणार नाही, जनतेला पाहिजे तेव्हा उत्तर देणार. एक कागद नाही, डॉक्युमेंट नाही. मी एक गोष्ट कागदाशिवाय बोललेलो नाही. आज रश्मी उद्धव ठाकरेंची 2 पत्र दिलंय. उद्धव ठाकरेंना अन्वय नाईकला लबाड म्हणायचं का? अन्वय नाईकने जागा दिली बंगले नव्हते. मग अन्वय नाईकने चिटींग केलं? कबूल करा, बेनामी संपत्ती, आभासी संपत्ती, घोस्ट प्रॉपर्टी उभी केली. कशासाठी असं करतात? आधी बंगले दाखवायचं, व्हॅल्युएशन वाढवायचं. आपल्याच माणसाला ती विकायची आणि नंतर वाढलेल्या व्हॅल्युएशनमध्ये काळा पैसा पांढरा करायचा, अशा गोष्टींसाठी करत असतात.
- मी दारु पित नाही म्हणून माहित नाही. किंग्ज फिशरच्या विमानात प्रवास केला होता, तर आता मला सांगा संजय राऊतांना चाणाक्य म्हणायचं का? त्यांनी काही नसताना रश्मी ठाकरेंच्या 19 बंगल्यांचा उल्लेख केला. त्यांनी काही नसताना रश्मी ठाकरेंच्या भावांच्या गोष्टींचा उल्लेख केला. संजय राऊतांनी असं का केलं? राकेश वाधवान म्हणजे कोण? राकेश वाधवान आणि शरद पवार यांचे कौटुंबिक संबंध आहे. पहिल्या पत्रकार परिषदेत गोळी ठाकरेंना दुसऱ्यात पवारांना. संजय राऊत चाणाक्य आहे. भांडूपला एचडीआयएलने ड्रीम मॉल बांधलं, ज्यात पीएमसी बँकेचं हेड ऑफिस आहे. या घोटाळ्यामुळे कारवाई होत नाही. सुप्रिया सुळेंचं हायस्कूल तिथं आहे. ती हास्कूल पवारांच्या हातात आहे, तो घोटाळा त्यांना बाहेर काढायचा होता का?
- राऊतांना माहितीय, जमीन 4.50 कोटीची आहे. ती जमीन कुणाकडून घेतली आहे हेही त्यांना माहीत आहे. 1996 पासून माझे आणि मित्राच्या वडिलांनी छोटा व्यवसाय सुरु केला. माझ्या प्रत्येक इलेक्शन एफिडेव्हीटमध्ये त्याचा उल्लेख आहे, लपवलं कुठं? आकडे तर नीट वाचा. आईने मुलाला 8 टक्के शेअर ट्रान्सफर केला, आई मुलाला देऊ शकत नाही?
- काही महिन्यांपूर्वी सचिन वाझेंसारखा महान व्यक्ती नाही. सर्वात प्रामाणिक अधिकारी आहे, असं उद्धव ठाकरेंनी वाझेंचं गुणगाण केलं आहे. त्यांनी शिवीगाळ केली आहे. राऊतांबद्दल द्वेष नाही. ही उद्धव ठाकरेंची भाषा आहे. शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याने वाझेचं गुणगाण गायलं आहे. राऊत हे शिवसेनेचे पहिले प्रवक्ते आहेत तर वाझे हे सेनेचे दुसरे प्रवक्ते आहेत.
संबंधित बातम्या:
VIDEO | माझ्या बायकोला जाऊन विचार, राऊतांच्या भxx वक्तव्यावर सोमय्या संतापले
Maharashtra News Live Update : उद्धव ठाकरे म्हणाले होते, सचिन वाझे सर्वात प्रामाणिक !