एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 112 कोटींचा निधी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाने एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार
कोरोना संकटकाळात टाळेबंदीची परिस्थिती निर्माण झाल्याने एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाला. प्रवासी संख्या कमी झाली. त्यामुळे परिवहन महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परिणामी पगारासाठी निधीची कमतरता निर्माण झाली.
मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. त्यानुसार आज तातडीने निधी वितरीत करण्यात आला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. (112 crore for salaries of ST employees, Deputy Chief Minister Ajit Pawar gave the decision)
महामारीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा बजावली
कोरोना संकट काळात एसटी कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा बजावली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठिशी महाविकास आघाडी सरकार ठामपणे उभे आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या परिवहन महामंडळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत झाले पाहिजे, अशी या सरकारची भूमिका आहे. कोरोना संकटकाळात टाळेबंदीची परिस्थिती निर्माण झाल्याने एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाला. प्रवासी संख्या कमी झाली. त्यामुळे परिवहन महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परिणामी पगारासाठी निधीची कमतरता निर्माण झाली. या कठिण परिस्थितीचा विचार करता परिवहन महामंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश दिले व त्याची तात्काळ अंमलबजावणी झाली. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे.
महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ
दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आलाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना 2 हजार 500 रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्षअनिल परब यांनी सोमवारी केली.
महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 17 टक्के होणार असल्याचे परब यांनी यावेळी सांगितले.
बस तिकीट किमान 5 रुपयांनी वाढणार
25 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होणार आहे. नव्या निर्णयानुसार तिकीट किमान 5 रूपयाने वाढणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर 5 ते 10रूपयांनी कमी करण्यात आले आहेत. (112 crore for salaries of ST employees, Deputy Chief Minister Ajit Pawar gave the decision)
1 वर्षाची वॉरंटी, 89 KM मायलेजसह Bajaj ची बाईक अवघ्या 37 हजारात, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर#Bajaj #Bike #Offerhttps://t.co/fclhUBnkOd
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 26, 2021
इतर बातम्या