कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची विक्रमी घोडदौड, दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या 50 लाखांवर

राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे.

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची विक्रमी घोडदौड, दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या 50 लाखांवर
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 5:16 PM

मुंबई : राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस (Corona Preventive Vaccine) देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 50 लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे. (2.5 crore people vaccinated in Maharashtra, over 50 lakh citizens got both doses of Corona Vaccine)

लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सुरूवातीपासून देशात आघाडीवर असून त्यामध्ये सातत्य कायम राखले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात 2 कोटी 7 हजार 70 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे 50 लाख 8 हजार 476 एवढी आहे.

लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्रापाठोपाठ उत्तरप्रदेश राज्याच्या क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशात आतार्यंत २ कोटी 15 लाख 65 हजार नागरिकांना लस देण्यात आली आहेत. तर या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर गुजरात हे राज्य आहे. गुजरातमध्ये 1 कोटी 91 लाख 88 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर राजस्थानमध्ये 1 कोटी 84 लाख 76 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

खासगी रुग्णालयासाठी लसींच्या किमती ठरल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 21 जूनपासून देशातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर केंद्र सरकारने लसपुरवठा तसेच इतर बाबींशी निगडित धोरणात्मक निर्णय घेणे सुरु केले आहे. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड तसेच स्पुतनिक-व्ही या लसींचे दर निश्चित केले आहेत. तसेच लसीवर 5 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णयही केंद्राने घेतला घेतला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खासगी रुग्णालयांसाठी लसीचे दर निश्चित केले आहेत. या निर्णयानुसार कोव्हिशिल्ड या लसीची किंमत प्रतिडोस 780 रुपये एवढी असेल. तर कोव्हॅक्सिन या लसीचा दर हा प्रतिडोस 1410 एवढा असेल. स्पुतनिक-V या लसीचा दर प्रतिडोस 1145 रुपये एवढा असेल. हे सर्व दर हे खासगी रुग्णालयांसाठी असतील.

भारतात किती लसीकरण झालयं?

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “भारतात आतापर्यंत 23.62 कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 18-44 वयोगटातील 3.04 कोटी लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. आतापर्यंत 45 वर्षांवरील 13.29 कोटी व्यक्तींना लसीची पहिला डोस देण्यात आला. देशात जास्त रुग्णसंख्या नोंदवणाऱ्या जिल्ह्यांच्या संख्येत घट झाली आहे. 28 एप्रिल ते 4 मे दरम्यान ही संख्या 531 वरून 209 झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन 100 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत आहे.”

लसीवर 5 टक्के जीएसटी आकारणार

केंद्र सरकारने कोरोना प्रधिबंधक लसीवर 5 टक्के GST आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व लसींवर 150 रुपये प्रतिडोस सर्व्हिस चार्ज आकारण्याचेसुद्धा केंद्राने ठरवले आहे. येत्या 21 जूनपासून केंद्र सरकारकडून राज्यांना लसीचे मोफत वाटप केले जाणार आहे. त्याआधी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या

भारतात किती लसीकरण झालयं? कुणाला किती लसीचे डोस? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सविस्तर माहिती

Coronavirus Updates: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा किंचित वाढ; 24 तासांत 2219 जण दगावले

(2.5 crore people vaccinated in Maharashtra, over 50 lakh citizens got both doses of Corona Vaccine)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.