26/11 Mumbai Attack | ‘जनतेसाठी बलिदान देणाऱ्यांचे आम्ही ऋणी’, बॉलिवूडकरांकडून शहीदांना श्रद्धांजली

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता.

26/11 Mumbai Attack | ‘जनतेसाठी बलिदान देणाऱ्यांचे आम्ही ऋणी’, बॉलिवूडकरांकडून शहीदांना श्रद्धांजली
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 4:10 PM

मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता. हल्ल्यानंतर मुंबईसह संपूर्ण देश हादरला होता. या दहशतवादी हल्ल्यांत 160हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या क्रूर हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने बॉलिवूडमधील कलाकारांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. (26/11 Mumbai Attack, Bollywood pays homage to martyrs) अभिनेता अक्षयकुमारने शहीदांना श्रद्धांजली वाहताना लिहले की, ‘26/11 हा दिवस मुंबईकर कधीही विसरू शकत नाहीत. शहीद आणि पीडितांना माझ्याकडून श्रद्धांजली! ज्यांनी या हल्लात स्वत:चा विचार न करता सर्वोच्च बलिदान दिले, त्यांचा मी नेहमीच ऋणी असणार आहे.

(26/11 Mumbai Attack, Bollywood pays homage to martyrs)

अभिनेता रणवीर शौरीने ट्विट करत म्हटले आहे की, “ही घटना कधीही विसरणार नाही आणि त्यांना कधीही माफ करू शकणार नाही.”

(26/11 Mumbai Attack, Bollywood pays homage to martyrs)

शिल्पा शेट्टीने देखील ट्विट करत म्हटले की, ‘या हल्ल्यामुळे बदललेल्या प्रत्येक जीवनासाठी शांती मिळावी यासाठी शहीदांना श्रद्धांजली!’

(26/11 Mumbai Attack, Bollywood pays homage to martyrs)

या व्यतिरिक्त इतर बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली

दहा ठिकाणी दहशतवादी हल्ले

26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री दहशतवाद्यांनी मुंबईत एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या परिसरात हल्ले झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट घडवून आणला होता.

हल्ले करणाऱ्या 10 पैकी 9 दहशतवाद्यांना मुंबई पोलीस आणि एनएसजीच्या कमांडोंनी कंठस्नान घातले तर अजमल आमीर कसाब हा दहशतवादी पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते आणि या हल्ल्यांमागे लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता.

संबंधित बातम्या :

मुंबईवरील 26 /11 दहशतवादी हल्ल्याची 12 वर्षे, पाकिस्तानची पोलखोल करणारे ‘सात मुद्दे’

मुंबई हल्ल्यामागचा सूत्रधार हाफिज सईदला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

(26/11 Mumbai Attack, Bollywood pays homage to martyrs)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.