Chandrashekhar Bawankule : 3 दिवस, 9 मंत्री, 21 कार्यक्रम, लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपचा प्लॅन काय, चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं…
राज्यात सध्या शिंदे-भाजपचे सरकार आहे. मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा काम कोणत्या पद्धतीने सुरू आहे ते महत्त्वाचं असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.
पालघर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा मानस आहे. यासाठी राज्यात 16 जागांवर भाजपकडून नऊ केंद्रीय मंत्र्यांकडून (Union Minister) लोकसभा प्रवास (Lok Sabha Travel) योजना आखण्यात आली आहे. यासाठी 16 लोकसभा क्षेत्रात जाऊन नऊ केंद्रीय मंत्री तीन दिवसांत 21 कार्यक्रम घेणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालघर येथे पत्रकार परिषद दिली. याच कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 16 लोकसभा प्रवास योजनेत केंद्र सरकारच्या किती योजना ह्या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचल्या का याचा आढावा केंद्रीय मंत्र्यांकडून घेतला जाणार आहे. तसंच या केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रत्येक लोकसभा क्षेत्राला एक केंद्रीय मंत्री कायमस्वरूपी मिळेल असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.
दिल्ली वारीवर अजित पवारांनी बोलू नये
राज्यात सध्या शिंदे-भाजपचे सरकार आहे. मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा काम कोणत्या पद्धतीने सुरू आहे ते महत्त्वाचं असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं. तर शरद पवार सांगतील त्यानंतरच सगळे निर्णय घ्यायचे, अशी स्थिती अजित पवारांची होती. त्यांनी शिंदे-फडणवीसांच्या दिल्ली वारीवर बोलू नये असा खोचक सल्लाही बावनकुळे यांनी अजित पवार यांना दिला.
केंद्र सरकारच्या कामांची माहिती जनतेला देणार
केंद्र सरकारच्या योजना तळागळातल्या लोकांपर्यंत पोहचायला हव्यात. त्यासाठी बुथ सक्षमीकरण केलं जात आहे. प्रत्येक बुथवर तीस सक्रिय कार्यकर्ते राहतील. तालुका, तसेच जिल्हास्तरावर भाजपच्या बैठका घेतल्या जातील. तसेच जिल्हास्तरावरही भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षानं केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी, हा उद्देश आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच मायक्रो लेव्हलवर सुरू असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
50 टक्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही
आरक्षणासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, संविधानानं आरक्षणानं भूमिका घेतली आहे. 50 टक्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. त्यामुळं लोकसंख्येच्या प्रमाणानुसारही आरक्षण दिलं जातं.