‘जेट’ला थेट दे ‘धक्का’, तहसिलदारांकडून विमानतळावर विमान सील, कारण असंय..
जेटच्या ४ एअरक्राफ्टला सील करण्याचे आदेश मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले. त्यानंतर तहसीलदारांनी चार विमाने सील केली.
विनायक गायकवाड, TV9 मराठी, मुंबई : महाराष्ट्र सरकारने (Maharashtra government)जेट एअरवेज कंपनीवर मोठी कारवाई केली. कंपनीने कर्मचाऱ्यांची ३५० कोटींची ग्रॅच्युइटी थकवली आहे. यामुळे कंपनीच्या चार बोईंग विमानांना नुकतेच (Boeing 777 aircraft) सील लावण्यात आले आहे. कंपनी जोपर्यंत कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी देत नाही, तोपर्यंत हे सील काढण्यात येणार नाही. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी यासाठी लढा दिला होता.
जेट एअरवेजने (Jet Airways)कंपनीतील कर्मचाऱ्यांना कंपनीने ग्रॅच्युइटी दिली नाही. त्यामुळे कंपनीचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीसाठी कायदेशीर लढा देत आहेत. कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात ट्रिब्युनलमध्ये धाव घेतली होती. ट्रिब्युनलने गेल्या ऑक्टोबरमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतरही कर्मचाऱ्यांना पैसे मिळाले नाही.
चार विमाने सील
जेटच्या ४ एअरक्राफ्टला सील करण्याचे आदेश मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले. त्यानंतर तहसीलदारांनी चारही विमाने सील केले. जोपर्यंत कामगारांची ग्रॅच्युइटी मिळत नाही तोपर्यंत कंपनीला एअरक्राफ्ट विकता येणार नाही.
किरण पावसकरांच्या संघटनेला मोठं यश
जेट एअरवेजमधील २२ हजार कामगारांची ग्रॅच्युइटी थकवल्याचा किरण पावसकर यांनी केला आहे. कायदेशील लढा यशस्वी लढूनही कर्मचाऱ्यांना रक्कम मिळाली नाही. यासंदर्भात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्त किरण पावसकर यांनी वेळोवेळी आवाज उठवला. अखेरी त्यात त्यांना यश आले. जिल्हाधिकाऱ्यांनी धकड कारवाई केल्यानंतर कर्मचाऱ्यांचा आशा आशा पल्लवित झाल्या आहेत.