कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड सुरुच, आतापर्यंत 5 कोटी डोस दिले

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्रात आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत 6 लाख 8 हजार नागरिकांना लस देण्यात आली.

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड सुरुच, आतापर्यंत 5 कोटी डोस दिले
लसीकरण कमी झाल्यास गावचे सरपंच पद धोक्यात
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 10:34 PM

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत 6 लाख 8 हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यात या मोहिमेत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या 5 कोटींवर गेली आहे. देशभरात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे. (5 crore doses of Corona vaccine given in Maharashtra)

14 ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी 9 लाख 64 हजार 460 नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. आज झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत 6 लाख 6 हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री उशिरापर्यंत त्यात वाढ होण्याची शक्यता आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तविली.

सीरमचे पुनावाला मोदी सरकारवर संतप्त

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. अशावेळी कोरोना लसीचा तुटवडा भासत असल्यामुळे लसीकरण मोहीम अधिक प्रभावी होताना दिसत नाही. अशावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पुण्यात जास्त कोरोना आहे, इथं लस द्या असं केंद्र सरकारला सांगितलं, पत्रही लिहिलं, पण मोदी सरकार त्याचं उत्तरच देत नाही, अशी प्रतिक्रिया सायरस पुनावाला यांनी दिली आहे. सायरस पुनावाला यांच्या या वक्तव्यामुळे लसीकरणावरुन राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं जोरदार राजकारण रंगण्याची चर्चा आहे.

पुण्यात सर्वाधिक कोरोना प्रादुर्भाव आहे. त्यामुळे पुण्यात जास्त लस द्या, असं केंद्र सरकारला सांगितलं, एक पत्रही लिहिलं पण मोदी सरकार त्याचं उत्तरंच देत नाही, असं सायरस पुनावाला यांनी म्हटलंय. लॉकडाऊन लावला नाही तर हर्ड इम्युनिटी तयार होते. 6 महिन्यानं लसीचा प्रभाव कमी होतो म्हणून बुस्टर डोसची गरज आहे. कदाचित त्यानंतरही लसीचा डोस घ्यावा लागू शकतो, असं पुनावाला म्हणाले. आम्ही वर्षाला 110 कोटी लस बनवू शकतो, त्यापेक्षा जास्त लस बनवू शकत नाही. इतर कंपन्या किती लस बनवतात हे माहिती नाही. त्यावरुन तुम्ही गणित करा आणि बघा की राजकारणी किती थापा मारत आहेत, असा गंभीर मुद्दाही पुनावाला यांनी उपस्थित केलाय.

मोदी सरकारला लस मिळाली नाही म्हणून 84 दिवसांचं अंतर

नोवोवॅक्स ही लस 12 वर्षापर्यंतच्या मुलांना देता येईल. पण अमेरिकेत काही परवानग्या बाकी आहे. त्यामुळे लगेच लहान मुलांना लस मिळणार नाही, असंही पुनावाला म्हणाले. त्याचबरोबर तिसरी लाट जास्त गंभीर नसेल असा दावाही त्यांनी केलाय. मोदी सरकानं एक्स्पोर्ट बंद केली हे खूप वाईट झालं. मात्र, यावर बोलू नका असं मला मुलानं सांगितलं असल्याचं सायरस पुनावाला म्हणाले. अमेरिकेत आताही अनेकांना लागण होत आहे. कोरोना जाणार नाही. दोन लसींमध्ये दोन महिन्यांचं अंतर योग्य आहे. पण मोदी सरकारला लस मिळाली नाही म्हणून त्यांनी दोन डोसमध्ये 84 दिवसांचं अंतर ठेवण्यास सांगितलं आहे. आम्हाला नफ्यात खूप नुकसान सहन करावं लागलं. सर्वांची अपेक्षा आहे की आम्हाला लस मिळावी पण ते शक्य नाही. मी लस विकून पैसे कमवायला बसलेलो नाही पण लोकांनी लस घ्यावी, असं आवाहनही सायरस पुनावाला यांनी केलंय.

इतर बातम्या

मोदी म्हणतात, भारत-पाक फाळणीचा स्मृती दिन साजरा करणार; पटोले म्हणातात, हा तर देशांतर्गत फाळणीचा डाव

..तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते हे माहिती नव्हतं का?, नाना पटोलेंचा खोचक सवाल

(5 crore doses of Corona vaccine given in Maharashtra)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.