वाडियात गर्भातील 50 टक्के बाळांना हृदयरोगांची लागण; नवजात बालकांमधील हृदयदोष वाढला

नवजात बाळांमध्ये जन्मजात हृदयदोषाचे निदान होत असल्याचं समोर आलं आहे (50 percent babies infected heart diseases in wadia hospital).

वाडियात गर्भातील 50 टक्के बाळांना हृदयरोगांची लागण; नवजात बालकांमधील हृदयदोष वाढला
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 8:44 PM

मुंबई : नवजात बाळांमध्ये जन्मजात हृदयदोषाचे निदान होत असल्याचं समोर आलं आहे. जन्मतः हृदयविकार असणाऱ्या या बाळांना मृत्यूचा धोका सर्वांधिक असतो. पण जन्मजात हृदयदोषांबद्दल बाळांच्या पालकांमध्ये फारशी जागरूकता नसल्याचे दिसून येत आहे. 7 ते 14 फेब्रुवारी हा आठवडा जन्मजात हृदयदोष जागृती सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जन्मतः हृदयदोष म्हणजे नेमकं काय? याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावे, यासाठी मुंबईतील परळ येथील जेरबाई वाडिया रूग्णालयातर्फे ‘लिटिल हार्ट्स वॉकथॉन’चं आयोजन करण्यात आले होते (50 percent babies infected heart diseases in wadia hospital).

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याशिवाय 40 हून अधिक डॉक्टर्सही यात सहभागी झाले होते. जन्मतः हृदयदोषांसह साधारणतः 100 पैकी एक मुलं जन्माला येतं. हृदयात निर्माण झालेल्या बिघाडाला नवजात हृदयरोग म्हणतात. कॉन्जेनिटल हार्ट डिफेक्ट (सीएचडी) हा जन्मजात हृदयदोषाचा एक प्रकार आहे. यात नवजात बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याने हृदयपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे हा आजार उद्भवतो (50 percent babies infected heart diseases in wadia hospital).

वाडिया रूग्णालयात दरवर्षी सुमारे 1000 गर्भाची इकोकार्डियोग्राफी केली जाते. यातील 50 टक्के प्रकरणात गर्भातील बाळा हृदयरोग असल्याचे निदान होते. 2015-16 या वर्षात 83 प्रकरणात बाळात दोष आढळून आला आहे. तर 2016-17 मध्ये यात वाढ होऊन ती 175 वर पोहोचली होती. 2017-18 या वर्षात या आकडेवारीत दुप्पटीने वाढ होऊन 375 बाळांमध्ये हृदयरोग असल्याचं समोर आले होते. तर 2019-20 मध्ये हृदयदोष असणाऱ्या बाळांची संख्या 600 वर पोहोचली आहे. वेळीच निदान आणि उपचार न मिळाल्याने अनेक मुलं दगावतात.

वाडिया रूग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी याबाबत माहिती दिली. ‘‘नवजात बाळाला हृदयदोष असणं हे आता सामान्य झाले आहे. वेळेवर निदान झाल्यास बाळावर उपचार करून त्याचे प्राण वाचवणे सोपं होतं. जन्मतः हृदयदोष असणाऱ्या नवजात बाळांवर उपचार करण्यासाठी वाडिया रूग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत तीन हजार पेक्षा जास्त बाळांच्या हदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. बऱ्याचदा बाळाला हृदयरोग असल्याचं निदान झाल्यावर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येते. या वॉकथॉनच्या माध्यमातून पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा मुख्य उद्देश आहे. नियमित स्क्रिनिंग, लवकर निदान आणि उपचार मिळाल्यास बाळ सर्वसामान्य मुलांप्रमाणे आपले आयुष्य जगू शकते, याबाबत लोकांना जागरूक केले जात आहे.”, असं डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या.

मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. ‘‘वाडिया रुग्णालयाने हा एक अविश्वसनीय उपक्रम राबविला आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याने मला आनंद झाला आहे. रूग्णांना परवडणारे उपचार आणि काळजी पुरविण्यात वाडिया रुग्णालय नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर सहाय्यक कर्मचारी यांच्यामार्फेत एकाच छताखाली रूग्णांना सर्वसमावेशक सेवा प्रदान करण्यात येत आहेत”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

हेही वाचा : मुंबईतील फुटपाथवर पेट्रोल डिझेलची अवैध विक्री, पोलिसांकडून पर्दाफाश

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.