Cyrus Mistry death: अपघातावेळी मुंबईतील महिला डॉक्टर चालवत होती गाडी, पोलीस महासंचालकांना अपघाताच्या चौकशीचे गृहमंत्री फडणवीसांचे आदेश
सायरस मिस्त्री ज्या मर्सिडिज कारने प्रवास करीत होते त्या गाडीचा नंबर MH-47-AB-6705 हा होता. अपघात दुपारी साड़े तीनच्या सुमारास अहमादाबाद मुंबई रस्त्यावर सूर्या नदीच्या पुलावर झाला. मर्सिडिज कार डिव्हायडरला आपटल्यानंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मर्सिडिज कारमधील एयर बॅगही ओपन झाल्या होत्या. मात्र तरीही सायरस मिस्त्री यांचे प्राण वाचू शकले नाहीत
मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाताबाबत आता नवी माहिती हाती आली आहे. मिस्त्री यांची मर्सिडिज कार एका रोड डिव्हायडरला धडकली, त्यानंतर झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला. या गाडीत सायरस मिस्त्री यांच्यासह चौघेजण प्रवास करीत होते. या चौघांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सायरस मिस्त्री यांच्यासोबत जहांगीर दिनशा पंडोले यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर अनायता पंडोले या अपघातात जखमी झाल्या आहेत. अनायता पंडोले या मुंबईत डॉक्टर आहेत. अपघात झाला त्यावेळी त्याच मर्सिडिज कार ड्राईव्ह करीत होत्या, अशी माहिती समोर आली आहे.
सायरस मिस्त्री ज्या मर्सिडिज कारने प्रवास करीत होते त्या गाडीचा नंबर MH-47-AB-6705 हा होता. अपघात दुपारी साड़े तीनच्या सुमारास अहमादाबाद मुंबई रस्त्यावर सूर्या नदीच्या पुलावर झाला. मर्सिडिज कार डिव्हायडरला आपटल्यानंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मर्सिडिज कारमधील एयर बॅगही ओपन झाल्या होत्या. मात्र तरीही सायरस मिस्त्री यांचे प्राण वाचू शकले नाहीत. अपघातानंतर सगळे रस्त्याच्याकडेला पडून होते. त्यानंतर पोलिसांनी या चौघांना कासाच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यातील दोघांना मृत घोषित करण्यात आले. उतर दोघांवर उपचार सुरु आहेत.
त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति ! पालघरनजिक झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून राज्याच्या पोलिस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. (2/2)#cyrusmistry #mumbai
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 4, 2022
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश
या अपघाताबाबत दु:ख व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताची माहिती घेतल्याचे सांगितले आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे. मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.
The untimely demise of Shri Cyrus Mistry is shocking. He was a promising business leader who believed in India’s economic prowess. His passing away is a big loss to the world of commerce and industry. Condolences to his family and friends. May his soul rest in peace.
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही वाहिली श्रद्धांजली
सायरस मिस्त्री यांच्या निधनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी ट्विट केले आहे. त्यात लिहिले आहे की- सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू स्तब्ध करायला लावणारा आहे. देशाच्या आर्थिक शक्तीवर त्यांचा विश्वास होता. त्यांचे निधनाने उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या परिवाराच्या आणि मित्रांच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Devastating News My Brother Cyrus Mistry passed away. Can’t believe it.
Rest in Peace Cyrus. pic.twitter.com/YEz7VDkWCY
— Supriya Sule (@supriya_sule) September 4, 2022
सुप्रिया सुळेंनी केले सर्व कार्यक्रम रद्द
सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंचे पुण्यातील सगळे कार्यक्रम स्थगित झाले आहेत. सुप्रिया सुळे मुंबईसाठी रवाना होणार आहेत. ही ह्रद्य पिळवटून टाकणारी घटना आहे. माझा भाऊ सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला आहे. मला विश्वास बसत नाहीये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.