Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे यांच्याकडून शिंदे सरकारवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप, ‘या’ कामात कोट्यवधींचा घोटाळा?

कंत्राटाच्या माध्यमातून कंत्राटदारांना तब्बल 48 टक्क्यांचा फायदा करुन देण्याचा हा शिंदे सरकाचा गेम असल्याचा धक्कादायक दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय.

आदित्य ठाकरे यांच्याकडून शिंदे सरकारवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप, 'या' कामात कोट्यवधींचा घोटाळा?
आदित्य ठाकरेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 6:07 PM

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण होईल, अशी घोषणा केली होती. त्यासाठी शिंदे सरकारकडून 5 हजार कोटींचं टेंडरही जाहीर करण्यात आलं होतं. पण त्याला कुणी प्रतिसाद न दिल्याने आता शिंदे सरकारने 6 हजार 80 कोटी रुपयांचं टेंडर जाहीर केलंय. या कोट्यवधींच्या टेंडरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा असल्याचा आरोपच आदित्य ठाकरे यांनी केलाय. रस्त्यांच्या कंत्राटामध्ये जीएसटीचे वेगळे पैसे लावण्यात आले आहेत. याशिवाय कंत्राटाच्या माध्यमातून कंत्राटदारांना तब्बल 48 टक्क्यांचा फायदा करुन देण्याचा हा शिंदे सरकाचा गेम असल्याचा धक्कादायक दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय.

“मी आजचा जो विषय तुमच्यासमोर ठेवतोय तो फार महत्त्वाचा विषय आहे. कारण हा विषय प्रत्येक व्यक्तीच्या जवळचा विषय आहे. आम्ही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही अनेक घोटाळ्यांबद्दल बोललो. पण कुठेही कारवाई झालेली दिसत नाही. लाज वाटून राजीनामा घेतलेला दिसत नाही. निर्लज्जपणे सगळा कारभार सुरु आहे. पण आजचा विषय महत्त्वाचा आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“या खोके सरकारने मुंबई महापालिकेची लूट सुरु केलेली आहे. आपल्याला आठवत असेल की, याच खोके सरकारने ऑगस्ट महिन्यात 5 हजार कोटींचे रस्त्यांचे टेंडर काढले होते. त्याला कुणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते टेंडर स्क्रॅब करण्यात आले”, असं आदित्य म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“आता मध्यंतरीच्या काळात त्यांनी बदलून नवे टेंडर काढले. पॅकेज दिले गेले आहेत. वर्क ऑर्डर पुढच्या एक-दोन दिवसात येतील. पण हे होण्यााआधी मी मुंबईकरांच्या समोर सत्य काय आहे ते लोकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असंही ते म्हणाले.

‘400 किमी रस्ते खोदून ठेवणार आणि ती कामे पूर्ण कधी होणार?’

“४०० किमीच्या रस्त्यांच्या काँक्रेटीकरणाचे टेंडर काढण्यात आले आहे. ६ हजार ८० कोटी एवढं मोठं हे टेंडर आहे. या टेंडरबद्दल काही ठळक गोष्टी मी सांगतो”, असं आदित्य म्हणाले.

“पहिली गोष्ट म्हणजे मुंबईत काम करण्याचा फेअर सिझन हा 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर असा असतो. पावसाळ्यानंतर जी काम सुरु होतात ती पावसाळ्याआधी बंद झाली पाहिजेत. पण जर हे काम आता वर्क ऑर्डर दिली, साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काम सुरु झालं तर ते होतील की नाही याचा भरोसा नाही. मुंबईत 400 किमी रस्ते खोदून ठेवणार आणि ती कामे पूर्ण कधी होणार?”, असा प्रश्न त्यांनी केला.

‘विचार न करता टेंडर काढलं’

“एक रस्ता बनवत असताना साधारणपणे 42 युटीलिटी रस्त्याच्या खाली असतात. त्यांच्याबरोबर कॉर्डिनेट करावं लागतं, 16 एजन्सीज बरोबर कॉर्डिनेट करावं लागतं. तसेच वाहतूक पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. मग कामी होतात. पण या सगळ्या गोष्टींचा विचार न करता 400 किमी रस्त्यांसाठी ६ हजार ८० कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात आलंय”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

“विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांना किती एजन्सी काम करतात, कुठे काम करतात याबद्दल माहिती नाही. मुख्यमंत्र्यांनी फिल्मसिटीबद्दल महापालिकेला 200 कोटींचं टेंडर काढण्यास सांगितलं होतं. पण तेव्हा महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं होतं की, फिल्मसिटी वेगळी संस्था आहे. तरीदेखील अजून त्या टेंडरचं काय झालं अजून माहिती नाही. मुंबई महापालिकेचा पैसे दुसऱ्या संस्थेला देवू शकतात का?”, असा सवाल त्यांनी केला.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.