AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निसर्गप्रेमी अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम, मुंबईत दुर्मिळ प्रजातीचे वृक्ष, वेलींचं संगोपन आणि संवर्धन होणार

सह्याद्री देवराई आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सयाजी शिंदे यांनी हा उपक्रम हाती घेतलाय.

निसर्गप्रेमी अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम, मुंबईत दुर्मिळ प्रजातीचे वृक्ष, वेलींचं संगोपन आणि संवर्धन होणार
निसर्गप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 4:48 PM

गोविंद ठाकूर, टीव्ही 9 मराठी, मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत निसर्गप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनी एका नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. सह्याद्री देवराई आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सयाजी शिंदे यांनी हा उपक्रम हाती घेतलाय. या उपक्रमा अंतर्गत दुर्मिळ प्रजातींचे वृक्ष आणि वेलींचं संगोपन आणि संवर्धन कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. सयाजी शिंदे यांनी यांनी पर्यावरण रक्षणासाठी मोठं काम हाती घेतली आहे. त्यांनी बीड जिल्ह्यात माळरानावर नंदनवन फुलवलं आहे. देशातील पहिलं वृक्ष संमेलनही त्यांनी घेतलं आहे. (Sayaji Shinde’s new venture jointly with Sahyadri Devrai and Sanjay Gandhi National Park)

सयाजी शिंदे यांनी हाती घेतलेला नवा उपक्रम कसा आहे, याची उत्सुकता अनेक निसर्गप्रेमींना लागली आहे. तर पहिल्या पावसाच्या आगमनानंतर बोरीवलीतील नॅशनल पार्क इथं कृष्णवड, तेंदु, अजानवृक्ष, हुंब यासारख्या 22 दुर्मिळ देशी प्रजातींची लागवड केली जाणार आहे. तसंच हिरडा, बेहेडा, मुचकुंद अशा अनेक औषधी वनस्पती आणि वेलींयुक्त बोटोनिकल गार्डन, शाश्वत आठवणींचा वारसा जपण्याच्या हेतूने उभारण्यात येणारी वृक्षरुपी ऑक्सिजन बँक यांचा या उपक्रमात समावेश असणार आहे. आतापर्यंत साधारण 22 देवराई , 1 वृक्ष बँक , 14 गड किल्ले या सोबतच राज्यभरात अनेक ठिकाणी किमान 4 लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण करणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेनं आता मुंबई हिरवी करण्याचा जणू ध्यास घेतला आहे.

अर्थदान, श्रमदान, वृक्षदान आणि बीजदानाच्या रुपात सहभागी व्हा

पर्यावरण दिनाच्या औचित्याने अनेकांचं निसर्गप्रेम जागं होतं. या दिवशी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली जाते. पण पुढे त्याकडे दुर्लक्ष होतं आणि लावलेली रोपंही जळून जाता. मात्र, सह्याद्री देवराई या संस्थेनं झाडांच्या संवर्धनाचं काम नियमीतपणे करण्याचा वसाच घेतला आहे. लोकांनीही या कार्यात जास्तीत जास्त सहभागी व्हावं यासाठी सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी या कार्यक्रमात अर्थदान, श्रमदान, वृक्षदान आणि बीजदानाच्या स्वरुपात अनेक पर्याय उपलब्ध केले आहेत. या पर्यायांच्या माध्यमातून लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलंय.

साताऱ्यात दुर्मिळ वनस्पतींचं उद्यान उभारणार

साताऱ्यातही अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून नव्याने उभारल्या जाणाऱ्या दुर्मिळ झाडांच्या उद्यानात ते मेहनत घेताना अनेकदा दिसून येतात. सह्याद्रीच्या पर्वत रांगामधील पश्चिम घाटामध्ये असणाऱ्या दुर्मिळ वनस्पती आणि वृक्ष त्याच बरोबर देशातील इतर राज्यातील 600 च्या वर असलेल्या दुर्मिळ वृक्षांच्या प्रजाती एकाच ठिकाणी लावण्याचा अनोखा प्रयोग साताऱ्यात सुरू करण्यात आला आहे. पुणे-बंगळुरु महामार्गालगत साताऱ्यातील म्हसवे गावाच्या बाजूला हा उपक्रम राबवण्यात येत आहे. महामार्गाजवळील पोलीस गोळीबार मैदानाच्या तब्बल 30 एकर जागेत सह्याद्री देवराई, पोलीस प्रशासन आणि वनविभाग यांच्यावतीने हे अनोखे उद्यान उभारण्यात येत आहे. सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून हे उद्यान उभारले जाणार आहे.

संबंधित बातम्या :

सयाजी शिंदेंकडून स्वत: आगीत उतरुन वणवा विझवण्याचा प्रयत्न

साताऱ्यात प्रत्येक शहीद जवानामागे एक झाड, सयाजी शिंदेंची संकल्पना

Sayaji Shinde’s new venture jointly with Sahyadri Devrai and Sanjay Gandhi National Park

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.