शाहरुख खान याची मुलगी सुहाना शेती करणार?, कोट्यवधीची जमीन खरेदी; बॉलिवूडमध्ये राहणार की नाही?
किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या आगामी सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. तिच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा सुरू असतानाच तिने शेती खरेदी केल्याचीही माहिती समोर आली आहे.
मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा ड्रग्स प्रकरणात चांगलाच चर्चेत आला होता. तुरुंगात गेल्यानंतर तब्बल दोन महिने मीडियाचा सर्व फोकस आर्यन खानवर होता. त्यानंतर शाहरुखही चर्चेत आला होता. त्याला कारण होतं पठाण हा सिनेमा. या सिनेमातील भगव्या बिकनीवरून तो चर्चेत आला होता. आता त्याची मुलगी सुहाना खान चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. जोया अख्तरच्या द आर्चीज या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. पण ही चर्चा सुरू असतानाच तिने शेतीसाठी जमीन खरेदी केल्याची बातमीही आली आहे. त्यामुळे सुहाना शेती करणार असल्याची चर्चा आहे. ती बॉलिवूडमध्ये राहणार की नाही? असाही संभ्रम निर्माण झाला आहे.
सुहाना खानने अलीबाग येथील थालगावात शेती खरेदी केली आहे. 1.5 एकरचं शेत तिने खरेदी केलं आहे. दीड एकर शेतीपैकी 2218 स्क्वेअर फूट शेतीवर कंन्स्ट्रक्शनचं कामही करण्यात आलं आहे. अशी माहिती समोर आली आहे. मात्र, त्याबाबतची अधिकृत माहिती कोणी दिलेली नाही. ही शेत जमीन कोट्यवधीची असल्याचंही सांगितलं जात आहे.
किती आहे किमत?
सुहाना खानने जी दीड एकर शेत जमीन खरेदी केली आहे. त्याची किमत 12 कोटी 91 लाख आहे. म्हणजे तिला ही शेती तब्बल 13 कोटीत पडली आहे. या खरेदीचे सर्व व्यवहार झाले आहेत. तसेच 1 जून रोजी या शेतीशी संबंधित नोंदणीही झाली आहे. सुहानाने 77 लाख 46 हजार रुपयांची स्टँम्प ड्युटीही भरली आहे. अंजली, रेखा आणि प्रिया नावाच्या तीन बहिणींकडून ही शेत जमीन खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शाहरुखकडे अलिबागमध्ये आधीच प्रॉपर्टी आहे.
कुठे होणार सिनेमा प्रदर्शित
सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. तिच्या पदार्पणाची सर्वच वाट पाहत आहेत. तिचा द आर्चीज हा सिनेमा आधी ओटीटीवर रिलीज होणार आहे. मात्र, हा सिनेमा कधी रिलीज होणार याची तारीख अजून नक्की झालेली नाही. या सिनेमाचा ट्रेलरही समोर आला आहे.
द आर्चीजमधून बडे स्टार किड्सही पदार्पण करत आहेत. अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नात अगस्तय नंदाही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. त्यामुळे या सिनेमातून कोणत्या स्टार किड्सचं भाग्य उजळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तसेच कुठल्या स्टार किड्सचा अभिनय दमदार होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.