MahaInfra Conclave : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी मांडला राज्याच्या विकासाचा लेखाजोखा

भविष्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल? राज्यात पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी काय करावे लागेल? हे जाणून घेण्यासाठी राज्यातील आघाडीची वृत्त वाहिनी ‘टीव्ही 9 मराठी’ने (TV9 Marathi) महा इन्फ्रा कॉन्क्लेव्हचे आयोजन केले. महा कॉन्क्लेव्हचं उद्घाटन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या हस्ते पार पडलं.

MahaInfra Conclave : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी मांडला राज्याच्या विकासाचा लेखाजोखा
एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 3:03 PM

मुंबई : भविष्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल? राज्यात पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी काय करावे लागेल? हे जाणून घेण्यासाठी राज्यातील आघाडीची वृत्त वाहिनी ‘टीव्ही 9 मराठी’ने (TV9 Marathi) महा इन्फ्रा कॉन्क्लेव्हचे आयोजन केले. महा कॉन्क्लेव्हचं उद्घाटन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी त्यांनी संबोंधित करताना राज्यात महाविकास आघाडीच्या काळात कोण कोणती विकास कामे झाली. ही विकास कामे करत असताना सरकार पुढे काय आव्हाने होती. सध्या राज्यात कोणती विकास कामे चालू आहेत. राज्यातील पायाभूत सुविधा अधिक वाढवण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे. याची सविस्तर माहिती दिली. रस्ते आणि पायाभूत सुविधांचा विकास यावरच कोणत्याही देशाचे भवितव्य ठरत असते, हेच लक्षात घेऊन राज्यातील रस्ते कसे अधिकाधिक चांगले करता येतील याकडे सरकारचे लक्ष असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे पाहुयात.

वर्षभरात समृद्धी महामार्ग सुरू होणार

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात समृद्धी महामार्गाचे राज्यातील विकासात मोठे योगदान असणार आहे. येत्या वर्षभरात वाहतुकीसाठी समृद्धी महामार्ग सुरू होईल. हा महामार्ग सुरू झाल्यास नागपूरहून मुंबईला अवघ्या काही तासांमध्ये जाणे शक्य होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांचे कल्याण होणार आहे.

मुंबई कोस्टल रोडचे काम प्रगतिपथावर

वाहतूक कोंडी ही मुंबईकरांची मोठी समस्या आहे. कोस्टल रोडमुळे वाहतूक कोंडीतून  मुंबईकरांची सुटका होणार आहे. कोस्टल रोड हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून, त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. डिसेंबर 2023 पर्यंत कोस्टल रोडचे काम पूर्ण होणार असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड रोड

मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड रोड प्रस्तावीत आहे. हा रोड पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते सिंधुदुर्गदरम्यान दळणवळण अधिक गतीमान होईल व विकासाला चालना मिळणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पुणे रिंग रोड

मुंबईहून पुण्याला गेल्यानंतर पुण्यात प्रवेश करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या भागात वाहनांची मोठी वर्दळ असते. हा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी रिंग रोड प्रस्तावित असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

गडचिरोलीतील विकास कामांना पुन्हा सुरुवात

कुठल्याही भागाचा विकास हा तिथे पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तरच होतो. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे पायाभूत सुविधांचा विकास झाला नाही. जी कामे सुरू होती, ती बंद करण्यात आली. मात्र आम्ही पुन्हा एकदा गडचिरोलीमधील बंद करण्यात आलेली सर्व विकास कामे पुन्हा सुरू केल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या कामांमध्ये शाळा, रुग्णालये आणि रस्त्यांच्या कामांचा समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांच्या ‘एफएसआय’मध्ये वाढ

शेतकऱ्यांच्या एफएसआयमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पूर्वी शेतकऱ्यांना केवळ 0.2 इतकाच एफएसआय होता. मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून, तो आम्ही एकपर्यंत नेला आहे. एफएसआय वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना देखील इतर व्यवसाय करता येतील, असे यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले

आम्ही घर खरेदी विक्री आणि नव्या बांधकामांसंदर्भात मध्यंतरी काही निर्णय घेतले. हे निर्णय बिल्डर लॉबीच्या फायद्याचे असल्याची टीका विरोधकांनी आमच्यावर केली. मात्र या निर्णयामुळे मुंबईत घर खरेदी करण्याचे प्रमाण वाढल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. घर खरेदी वाढल्याने महसुलात देखील वाढ झाल्याचे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Video – Maha-Infa Conclave | टेडा सेंटरचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला; उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी सांगितलं लाभाचं गणित

VIDEO: नक्षलवाद्यांच्या धमक्या येतात, माझ्यावर परिणाम होत नाही, मी फक्त काम करत राहतो: एकनाथ शिंदे

MahaInfra Conclave: राज्यात 2025 पर्यंत 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणक; कोणते नवे प्रकल्प येणार? उद्योग मंत्री सुभाष देसाईंची सविस्तर माहिती

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....