BREAKING | 5 तासांच्या चौकशीनंतर समीर वानखेडे यांना धक्का देणारी मोठी बातमी

समीर वानखेडे यांची सीबीआकडून तब्बल पाच तास चौकशी करण्यात आल्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

BREAKING | 5 तासांच्या चौकशीनंतर समीर वानखेडे यांना धक्का देणारी मोठी बातमी
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 5:44 PM

मुंबई : IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीय. समीर वानखेडे यांना नुकतंच मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय. हायकोर्टाने त्यांना तात्पुरता स्वरुपात अटकेपासून संरक्षण दिलं आहे. त्यानंतर समीर वानखेडे आज सीबीआय चौकशीला सामोरे गेले. पण या दरम्यान समीर वानखेडे यांचं टेन्शन वाढवणारी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु असतानाच आता आणखी एका यंत्रणेकडून त्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

समीर वानखेडे यांची एकीकडे सीबीआयकडून चौकशी सुरू असतानाच सीबीआयसीकडूनही चौकशी सुरू केली जाण्याची शक्यता आहे. सीबीआयसी म्हणजे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभाग आहे. याच विभागाच्या अधिपत्याखाली वानखेडे काम करतात. एनसीबीच्या एसआयटीने तयार केलेला अहवाल सीबीआयसी विभागाकडेही देण्यात आलाय.

सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता याच अहवालाच्या आधारे वानखेडे यांची विभागीय चौकशी सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या चौकशीनंतर वानखेडे यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाईदेखील होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

समीर वानखेडे यांची तब्बल पाच तास चौकशी

समीर वानखेडे यांच्याकडे एनसीबीच्या मुंबई झोनल डायरेक्टरपदाची जबाबदारी असताना त्यांच्या टीमने मुंबईहून गोव्याच्या दिशेला निघालेल्या कार्डिलिया क्रूझवर छापा टाकला होता. ड्रग्स प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यावेळी हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं.

आर्यन तब्बल 20 दिवस जेलमध्ये होता. त्यावेळी आर्यनला जेलमधून सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी 25 कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात येतोय. या आरोपांप्रकरणी एसनीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासही केलाय. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलंय.

सीबीआयने या प्रकरणी समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल केलाय. सीबीआयकडून वानखेडे यांना कधीही अटक केली जाण्याची शक्यता होती. पण त्याआधीच वानखेडे यांनी कोर्टात धाव घेतली. वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. त्यानंतर वानखेडे आज सीबीआय चौकशीला सामोरं गेले.

समीर वानखेडे यांची आज तब्बल पाच तास चौकशी पार पडल्याची माहिती मिळत आहे. ते सकाळी साडेदहा वाजता सीबीआय कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर जवळपास पाच तास त्यांची चौकशी झाली. पण सीबीआयला अजूनही काही प्रश्रांची उत्तरे मिळालेली नाहीत. त्यामुळे सीबीआय कदाचित पुन्हा एकदा समीर वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावू शकते.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.