कोरोनानंतर आता मंकीपॉक्सचं संकट, 15 दिवसांत 15 देशांत पसरला आजार, लक्षणे सापडली तर इंग्लंडमध्ये क्वारंटाईन, मुंबईतही संशयित क्वारंटाईन करणार

मुबंई– कोरोना महामारीच्या (Covid19)मुकाबला करत असलेले जग आता नव्या आजाराच्या विळख्यात सापडत आहे. हा आजार गेल्या १५ दिवसांत १५ देशांत पसरला आहे. सोमवारी बेल्जियमनंतर आता इंग्लंडमध्येही मंकीपॉक्स (Monkey pox)झालेल्या रुग्णांना २१ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा २१ दिवसांचा कालावधी बंधनकारक करण्यात आला आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेनंही (WHO)हा आजार गंभिर्याने घेतला आहे. […]

कोरोनानंतर आता मंकीपॉक्सचं संकट, 15 दिवसांत 15 देशांत पसरला आजार, लक्षणे सापडली तर इंग्लंडमध्ये क्वारंटाईन, मुंबईतही संशयित क्वारंटाईन करणार
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 8:48 PM

मुबंईकोरोना महामारीच्या (Covid19)मुकाबला करत असलेले जग आता नव्या आजाराच्या विळख्यात सापडत आहे. हा आजार गेल्या १५ दिवसांत १५ देशांत पसरला आहे. सोमवारी बेल्जियमनंतर आता इंग्लंडमध्येही मंकीपॉक्स (Monkey pox)झालेल्या रुग्णांना २१ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा २१ दिवसांचा कालावधी बंधनकारक करण्यात आला आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेनंही (WHO)हा आजार गंभिर्याने घेतला आहे. कोणत्याही देशात या आजाराचा एकही रुग्ण सापडला तरी तो उद्रेक मानण्यात येणार आहे. दुसरीकडे भारतातही मंकीपॉक्सचा आजार गतीने पसरत चालल्याचे दिसते आहे. मुंबई महापालिकेनंही याची पूर्वतयारी करत, कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये २८ बेड्सचा आयसोलेशन वॉर्ड तयार केला आहे.

आत्तापर्यंत कोणकोणत्या देशात साप़डले रुग्ण

आत्तापर्यंत इंग्लंड, अमेरिका इटली, स्वीडन, फ्रान्स, पोर्तुगाल, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, नेदरलँड, इस्र्यायल, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण सापडले आहेत. गेल्या २ आठवड्यांत या रुग्णांची संख्या १००च्या पार पोहचली आहे. सुदैवाने या आजाराने अद्यापपर्यंत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकारही एक्शन मोडमध्ये

केंद्र सरकारच्या पातळीवरही मंकीपॉक्सबाबत टेन्शन वाढले आहे. गतीने होत असलेल्या संक्रमणाच्या काळात, आयसीएमआरला अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंकीपॉक्स प्रभावित देशातून येणाऱ्या आजारी प्रवाशांना तातडीने क्वारंटाईन करा, असे आदेश विमानतळ आणि बंदरांवर देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने हे आदेश जारी केले आहेत. या आजारी व्यक्तींचे सॅम्पल्स हे पुण्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीला पाठवण्यास सांगण्यात आले आहे.

गर्भवती महिला आणि मुलांना जास्त धोका

मंकीपॉक्ससारख्या दुर्मीळ आजाराचे संक्रमण झाल्यास हा आजार काही कालावधीने आपोाप बरा होतो. मात्र काही जणांसाठी हा गंभीर होण्याची भीती असल्याचे जागितक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. यात लहान मुले, गर्भवती महिला आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्यांचा समावेश आहे. ५ वर्षांखालील मुलांना याचे संक्रमण लगेच होण्याची शक्यता आहे.

काय आहे मंकीपॉक्स, कसा होतो फैलाव

मंकीपॉक्स हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. जे १९५८ साली कैदेत असलेल्या एका माकडाला झालेले आढळून आले होते. १९७० साली या आजाराचे संक्रमण माणसांनाही होत असल्याचे समोर आले.

मंकीपॉक्सचे संक्रमण हे डोळे, नाक आणि तोंडाच्या माध्यमातून पसरते. रुग्णाचे कपडे, भांडी आणि पांघरुणाला स्पर्श केला तरी हा आजार पसरण्याची शक्यता आहे. तसचं माकडं, उंदीर अशा जनावरांना मारल्याने किंवा त्यांच्या रक्ताच्या संपर्कात आल्यास मंकीपॉक्स होण्याची शक्यता आहे.

मंकीपॉक्सची काय आहेत लक्षणे

मंकीपॉक्सची लक्षणे संक्रमणानंतर पाचव्या ते २१ व्या दिवसांपर्यंत दिसतात. सुरुवातीची लक्षणे ही फ्ल्यू सारखी आहेत. यात ताप, डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, हातपायांत थरथर,दमल्यासारखे वाटणे अशी याची प्राथमिक लक्षणे आहेत. त्यानंतर चेहऱ्यावर पुळ्या येण्यास सुरुवात होते. त्यानंतर हे फोड शरिराच्या इतर भागांवरही पसरतात. काही दिवसांनी या पु्ळ्या बऱ्या होतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.