AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानी यांच्यानंतर रतन टाटा यांना धमकी, धमकी देणार कोण?

tata sons chairman ratan tata received death threats | टाटा समूहाचे मानद चेअरमन रतन टाटा यांना धमकीचा फोन आला आहे. धमकी देणाऱ्याने ‘रतन टाटा यांची सुरक्षा वाढवून टाका, अन्यथा त्यांचे हाल सायरस मिस्त्री सारखे होईल’, अशी धमकी दिली आहे. पोलिसांना आरोपीचा शोध लागला आहे.

मुकेश अंबानी यांच्यानंतर रतन टाटा यांना धमकी, धमकी देणार कोण?
| Updated on: Dec 16, 2023 | 11:16 AM
Share

मुंबई, 16 डिसेंबर | देशातील प्रसिद्ध उद्योगपतींना धमकी देण्याचे प्रकार वाढत आहे. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना यापूर्वी धमक्यांचे फोन आले होते. आता टाटा समूहाचे मानद चेअरमन रतन टाटा यांना धमकीचा फोन आला आहे. धमकी देणाऱ्याने ‘रतन टाटा यांची सुरक्षा वाढवून टाका, अन्यथा त्यांचे हाल सायरस मिस्त्री सारखे होईल’, या शब्दांत फोनवरुन धमकी दिली. धमकीच्या या कॉलनंतर मुंबई पोलीस अलर्ट झाले. पोलिसांनी आपल्या एका टीमला रतन टाटा यांच्या सुरक्षकडे लक्ष ठेवण्याचे काम दिले तर दुसऱ्या टीमने फोन करणाऱ्याचा शोध सुरु केला. मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याची माहिती मिळाली आहे.

फोन आला आणि तपास सुरु झाला

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमचा फोन खणाणला. फोन करणाऱ्याने रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा, अन्यथा त्यांचे सायरस मिस्त्री होईल, असे सांगितले. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन ही माहिती वरिष्ठांना देण्यात आली. पोलिसांनी फोन कोठून आला, त्याचा तपास सुरु केला. पोलिसांनी धमकी देणाऱ्या कॉलरशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा फोन बंद होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधले. तो कर्नाटकातील असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या घरी गेल्यानंतर पाच दिवसांपासून ते बंद असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीचा पत्ता शोधला असता फोन करणारा पुणे येथील रहिवासी असल्याचे समोर आले. हा आरोपी मनोरुग्ण असल्याचे समोर आले.

अंबानी यांना मिळाली होती धमकी

रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनाही यापूर्वी धमकी मिळाली होती. एका ईमेल मार्फत त्यांना ही धमकी देण्यात आली. त्यांच्याकडून वीस कोटी रुपये मागण्यात आले. पोलिसांना या आरोपीला अटक केली होती.  27 ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानी यांनी ही धमकी मिळाली होती. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही एका व्यक्तीने दक्षिण मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलला फोन केला होता. त्याने रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.