VIDEO: मुंबईकर काही ऐकेनात, सलग 15 व्या दिवशी लोकलला प्रचंड गर्दी; कोरोना नियमांचे तीन तेरा
मुंबईत कोरोनाचा वाढलेला संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आलेले असतानाच मुंबईतील लोकलमधील गर्दी मात्र अजूनही कमी होताना दिसत नाही. (after restrictions imposed, rush increase in mumbai local)
मुंबई: मुंबईत कोरोनाचा वाढलेला संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आलेले असतानाच मुंबईतील लोकलमधील गर्दी मात्र अजूनही कमी होताना दिसत नाही. जणू काही कोरोनाचा समूळ नायनाट झाल्याच्या थाटातच मुंबईकर लोकलमधून प्रवास करत आहेत. आज सलग 15 व्या दिवशी लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. मुंबईतील विविध स्थानकात लोकल गर्दीचं हे चित्रं दिसत असून कोरोना नियमांचे तीन तेरा वाजल्याचंही पाहायला मिळत आहे. (after restrictions imposed, rush increase in mumbai local)
मुंबईत अत्यावश्यक सेवेतील केवळ 15 टक्के नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, सर्व सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी नसतानाही लोक सर्रासपणे लोकलमधून प्रवास करताना दिसत आहे. आजही लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. कुर्ला रेल्वे स्थानकात सकाळपासूनच प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळत होती. तर इतर स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. रेल्वेत सर्वसामान्यांची कुठलीच चेकिंग सध्या होत नाहीये. सर्व गेट बहूतेक ठिकाणी खूलेच आहेत. त्यामुळे कोरनाचा प्रसार कसं थांबणार? असा सवाल केला जात आहे. अनेक रेल्वे स्थानकात टीटीही दिसत नसल्याने प्रवाशांची भीड चेपली असून ते सर्रासपणे प्रवास करताना दिसत असल्याचंही चित्रं आहे.
नालासोपारा स्थानकात रांगाच रांगा
नालासोपारा रेल्वेस्थानाकातही आज पहाटेपासून प्रवाशांच्या भल्या मोठ्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना आयकार्ड पाहूनच रेल्वे स्थानकात सोडले जात आहे. आरपीएफचे जवान आणि तुलिंज पोलिसांकडून प्रत्येकाचे आयकार्ड तपासले जात आहे. कोरोना निर्बंध पाळून नागरिकांनी लोकलमधून प्रवास करावा याचे आवाहन केले जात आहे. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच लोकलमध्ये प्रवेश दिला जात असून इतरांनी विनाकारण रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी करू नये, असं आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
घरकाम करणाऱ्या महिलांचे हाल
कोरोनाचा साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार ने 21 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून सर्वसामान्य नागरिकांना लोकल सेवा बंद केली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील प्रवाशानाच लोकलमध्ये प्रवेश दिल्या जात आहे. पण सर्वसामान्य प्रवाशांसाठी प्रवासाची काय सुविधा याची मात्र सरकारने कोणतीच घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशाने कामावर जायचे कसे? असा प्रश्न प्रवाशांसमोर निर्माण झाला आहे. नालासोपाऱ्यातून घरकाम, मोलमजुरीचे काम करणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणात मुंबईला जातात. कमवाल तेव्हाच चूल पेटते. कामावर नाही गेले तर घर कसे चालवायचे, मुला बाळांना काय खाऊ घालायचे, लोकलमध्ये प्रवेश नाही. खाजगी वाहनाने जाऊ शकत नाहीत, असा घरकाम करणाऱ्या महिला समोर प्रश्न निर्माण झाला आहे. तर सामान्य प्रवाशांचीही हीच अवस्था आहे. (after restrictions imposed, rush increase in mumbai local)
VIDEO: Special Report | मे महिन्याचा पहिला आठवडा उच्चांक गाठणार, भारतासाठी एप्रिलपेक्षा मे घातक ठरणार?https://t.co/D6k0FiE7bL#Corona #CoronaInfection #India
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 23, 2021
संबंधित बातम्या:
अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय?; शिवसेनेचा सवाल
Corona Cases and Lockdown News LIVE : समृद्धी महामार्गाचा ऑक्सिजन रुग्णालयाकडे वळवला, कामकाज ठप्प
(after restrictions imposed, rush increase in mumbai local)