ऐश्वर्या राय हिच्या गाडीला अपघात, व्हिडिओ व्हायरल, युजर्स म्हणाले…
Aishwarya Rai Bachchan Car Accident: ऐश्वर्याच्या जुहू येथील निवासस्थानाजवळ ही घटना घडली. या अपघातात कोणतीही दुखापत किंवा मोठे नुकसान झाले नाही. ऐश्वर्या रायच्या सिल्वर वेलफायर या गाडीला हा धक्का लागला. बसचा धक्का लागला तेव्हा गाडीत कोण होते, त्यासंदर्भातील माहिती अजून समोर आली नाही.

Aishwarya Rai Bachchan Car Accident: बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या हिच्या कारला बेस्ट बसचा धक्का लागला. बुधवारी दुपारी ऐश्वर्याच्या जुहू येथील निवासस्थानाजवळ ही घटना घडली. या अपघातात कोणतीही दुखापत किंवा मोठे नुकसान झाले नाही. ऐश्वर्या रायच्या सिल्वर वेलफायर या गाडीला हा धक्का लागला. बसचा धक्का लागला तेव्हा गाडीत कोण होते, त्यासंदर्भातील माहिती अजून समोर आली नाही. याबाबत अधिकृत माहिती ऐश्वर्या राय बच्चन हिच्या टिमकडून देण्यात येणार आहे. दरम्यान, या अपघातासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरून शेअर करण्यात आला आहे. एका कारला बसने धडक दिल्याचे दिसून येते. ही कार ऐश्वर्या राय बच्चनची असल्याचा दावा केला जात आहे. बेस्टची बस त्या कारला धडकली. धडक झाल्यानंतर कार घटनास्थळावरुन निघाली. या अपघातात कारचेही काहीच नुकसान झाले नाही.




View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर युजर्सच्या कमेंट समोर येत आहे. एका युजरने लिहिले आहे की, ‘बसमध्ये सगळे चांगले आहेत, नाही का?’ आणखी एका युजरने लिहिले की, सर्वजण सुरक्षित आहे का? आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ही जया बच्चनची कार असती तर तिने बसचालकाला धडा शिकवला असता?
ऐश्वर्या राय बच्चन हिला शेवटचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मुलगा कोणार्क यांच्या लग्नात पाहिले गेले होते. कोणार्क याने त्याची गर्लफ्रेंड नियतीसोबत लग्न केले आहे. या लग्नसोहळ्यास संपूर्ण बच्चन परिवार उपस्थित होता. त्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहे.
दरम्यान, अभिनेता सोनू सूद याची पत्नी सोनाली सूद हिचा मागील सोमवार अपघात झाला होता. त्या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. तिची प्रकृती आता बरी आहे. अभिनेता सोनू सूद याने सोशल मीडिया पोस्ट करत त्याच्या पत्नीच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.