अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना फटकारले, साहेबांचा निर्णय अशा शब्दांमध्ये मांडला

Ajitj Pawar on Sharad Pawar Resigns : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर पक्षात बिकट प्रसंग आला. अजित पवार यांनी शरद पवार यांचा निर्णयाचे असे समर्थन केले.

अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना फटकारले, साहेबांचा निर्णय अशा शब्दांमध्ये मांडला
Ajit pawar and Sharad Pawar
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 2:27 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राष्ट्रवादीत जणू भूकंप आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय अमान्य केला आहे. पवारांना राजीनामा मागे घेण्याची वारंवार विनंती करण्यात येत आहे. पक्षाचे सर्वच नेते राजीनामा मागे घ्या म्हणून शरद पवार यांना आग्रह धरत आहेत. यावेळी जयंत पाटील यांना तर बोलताना अश्रूच अनावर झाले. त्यांना बोलताही येईनासे झाले. परंतु यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन करत चार खडे बोल कार्यकर्त्यांना सुनावले.

काय म्हणाले अजित पवार

सगळ्याचा भावना साहेबांनी ऐकल्या. पवार साहेब अध्यक्ष नाही म्हणजे पक्षात नाही, असा गैरसमज तुम्ही करुन घेत आहेत. परंतु आज काँग्रेसचे अध्यक्ष आहे मल्लिकार्जुन खरगे, पक्ष चालला आहे सोनियाजींच्या नावावर. पवार साहेबांचा वयाचा विचार करता नव्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी दिली जाणार आहे. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल.

हे सुद्धा वाचा

नवीन अध्यक्ष असा काम करणार

साहेब अध्यक्ष असो किंवा नसो, असाच परिवार जात राहील. साहेब आहेतच ना, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष होणार आहे. साहेबांच्या जीवावर राष्ट्रवादी पक्ष चालणार आहे. साहेबांचा निर्णय एक धक्का आहे. पण साहेब आपल्या निर्णयावर ठाम आहेत. साहेबांच्या मार्गदर्शनखाली पक्ष चालणार आहे. साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नको? या शब्दांत चार खडे बोल कार्यकर्त्यांनी सुनावले. नवीन येणारा अध्यक्ष साहेबांशी चर्चा करुन निर्णय घेईल. साहेब काल निर्णय जाहीर करणार होते. परंतु काल महाविकास आघाडीची सभा होती. त्यामुळे हा निर्णय आज जाहीर केला.

समिती तुमच्या मनातील निर्णय घेईल

अजित पवार म्हणाले, ‘समिती ठरवेल ते शरद पवार यांना मान्य असेल…’ शिवाय त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती देखील केली. एवढंच नाही तर, शरद पवार यांनी घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते भावुक झाले. परिवारातील सदस्य असतील. मी असेल सुप्रिया सुळे असतील.. तुम्ही भावनिक साथ जी साहेबांना घातली, ती आमच्या लक्षात आली आहे. पण तुम्ही काही अडचण लक्षात घ्या.. कमिटी तुमच्या मनातील योग्य निर्णय घेईल. एवढीच खात्री मी तुम्हाला या निमित्ताने देतो…, असे अजित पवार यांनी सांगितले.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.