राणे अमित शहांना उद्घाटनासाठी भेटले, त्यावेळेस शहा नेमकं काय म्हणाले?; वाचा सविस्तर

भाजपचे नेते नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग येथील मेडिकल कॉलेजचं रविवार 7 फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार आहे. (amit shah will inaugurate narayan rane medical college)

राणे अमित शहांना उद्घाटनासाठी भेटले, त्यावेळेस शहा नेमकं काय म्हणाले?; वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 8:13 PM

मुंबई: भाजपचे नेते नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग येथील मेडिकल कॉलेजचं रविवार 7 फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी शहा स्वत: सिंधुदुर्गात येणार आहेत. राणेंनी शहांची प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देताच शहा यांनीही त्यांना कार्यक्रमाला येण्याचा होकार दिला. (amit shah will inaugurate narayan rane medical college)

मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. अमित शहांनी माझ्या कॉलेजच्या परवानगीसाठी दोन वेळा फोन केले होते. परवा मी आमंत्रण देण्यासाठी गेलो तेव्हा ते म्हणाले की, मै 100 टक्का आऊंगा. त्यांनी लगेच आमंत्रण स्वीकारले, असं राणे म्हणाले. अमित शहा हे बुद्धिवान नेते आहेत. माझे आवडते नेते आहेत, असंही ते म्हणाले.

राणेंचे शक्तिप्रदर्शन?

या कार्यक्रमातून राणे सिंधुदुर्गात शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं बोललं जात होतं. पण राणे यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. हा कार्यक्रम कँपसपुरता मर्यादित आहे. बाहेर सर्वांसाठी खुला नाही. पण कार्यक्रमस्थळी शहा यांचं जोरदार स्वागत आणि मानसन्मान होईल, असं राणे म्हणाले.

आणि राणे गहिवरले…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांमुळे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकलो. माझं ऋण आहे. या जिल्ह्याचं आरोग्य चांगलं राहावे म्हणून हॉस्पिटल काढलं. मेडिकल कॉलेजचं स्वप्न पाहिले. जिल्ह्यासाठी प्रत्येक स्तरावर खूप प्रकल्प सुरू केले. चार वर्षापासून मेडिकल कॉलेजसाठी मेहनत घेतली. सुसज्ज, आधुनिक यंत्रणा असलेलं हॉस्पिटल आहे. उद्या मेडिकल कॉलेज सुरू होत आहे. कॉलेज सुरू होत आहे याचा खूप आनंद. संकल्प केला आणि त्यात यश मिळतेय याचा आनंद आहे. पहिल्याच वर्षी प्रवेश फुल झाले. दर्जेदार कॉलेज बांधलंय. क्लासरूम, हॉस्टेल एअर कंडिशन आहेत. उद्या देशाचे गृहमंत्री अमित शहा येत आहेत. त्यांच्या हस्ते मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होत आहे. हा माझा आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे, असं सांगताना राणेंना गहिवरून आलं होतं.

विमानतळ कधी सुरू होईल?

राणे यांना यावेळी चिपी विनातळाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, आता तो राज्य सरकारच्या अखत्यारित विषय आहे. काही मुद्दे बाकी आहेत. रस्ते, पाणी आणि वीज व्यवस्था झाल्यावर दोन महिन्यांच्या आत विमानतळ सुरू होईल. 2014 ला मी विमानतळ बांधून उभं केलं. त्यानंतर सुरू करणे पुढच्या सरकारचे काम होते, ते अजून झालं नाही. (amit shah will inaugurate narayan rane medical college)

पहिल्या विमानाने प्रवास करणार का?

विमानतळ सुरू झाल्यानंतर पहिल्या विमानाने प्रवास करणार का? असा सवाल राणेंना करण्यात आला. त्यावर कोण कोण प्रवासी आहेत ते पाहिन आणि मग ठरवेन. चांगलं वातावरण ठेवण्याजोगे प्रवासी असतील तर प्रवास करेन त्यांच्यासोबत, असं मिश्किल उत्तरही त्यांनी दिलं. तसेच विमानतळ सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात मोठी हॉटेलही तयार होतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. (amit shah will inaugurate narayan rane medical college)

संबंधित बातम्या:

Maharashtra Congress President | काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची वर्णी

काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळावं, माणिकराव ठाकरेंची पहिल्यांदाच उघड मागणी

जेव्हा राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला, त्यावेळेस नेमकं काय म्हणाले उद्धव?; वाचा सविस्तर

(amit shah will inaugurate narayan rane medical college)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.