Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anant Ambani meets Eknath Shinde | पडद्यामागे काय घडतंय? अनंत अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास खलबतं

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. सुप्रीम कोर्टात नुकतंच आज आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. त्यानंतर आज संध्याकाळी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हालचाली वाढल्या.

Anant Ambani meets Eknath Shinde | पडद्यामागे काय घडतंय? अनंत अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास खलबतं
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 7:53 PM

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही भेट घडून आलीय. या भेटीत एकनाथ शिंदे आणि अनंत अंबानी यांच्यात अर्धा तास चर्चा झालीय. ही चर्चा नेमकी कशासाठी झाली, कोणकोणते विषय या चर्तेत होते याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण त्यांच्या या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालंय.

मुकेश अंबानी हे देशातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्या या भेटीला जास्त महत्त्व आहे. कारण आगामी काळात लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात ठेवून रिलायन्स कंपनीकडून महाराष्ट्रात मोठी गुंतवणुकीची काही घोषणा होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिंदे आणि अंबानी यांच्यात याआधीही भेट

एकनाथ शिंदे आणि अनंत अंबानी यांच्यात अशी पहिल्यांदाच भेट झालेली नाही. याआधीदेखील अनेकदा दोघांची भेट झालीय. गेल्यावर्षी राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही अनंत अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्यात तासभर बैठक पार पडली होती. विशेष म्हणजे यावर्षी गणेशोत्सवात मुकेश अंबानी आपल्या कुटुंबियांसह वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर आज अनंत अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा बंगल्यावर भेट घडून आलीय. यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय.

एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची आज महत्त्वाची बैठक

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. ठाण्यात आज (17 ऑक्टोबर) रात्री जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुखांची बैठक बोलावण्यात आलीय. या बैठकीच दसरा मेळावा संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे. ठाण्याच्या हॉटेल टिपटॉप प्लाझामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत दसरा मेळावा विषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे. या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहेत.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.