Rajya Sabha Election 2022: दिलासा नाहीच! नवाब मलिक, अनिल देशमुखांना राज्यसभेसाठी मतदानाची परवानगी नाहीच, कोर्टाने अर्ज फेटाळला

Rajya Sabha Election 2022: अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता यावं म्हणून राष्ट्रवादीने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर काल सुनावणी झाली होती. कोर्टाने आज त्यावर निर्णय देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Rajya Sabha Election 2022: दिलासा नाहीच! नवाब मलिक, अनिल देशमुखांना राज्यसभेसाठी मतदानाची परवानगी नाहीच, कोर्टाने अर्ज फेटाळला
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 3:20 PM

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) आणि अनिल देशमुख (anil deshmukh) यांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळेल का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाने या दोन्ही नेत्यांना मतदानाची परवानगी नाकारली आहे. सत्र न्यायालयाने या दोन्ही नेत्यांचे अर्ज फेटाळून लावले आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही नेत्यांना मतदान करता यावं म्हणून राष्ट्रवादीने कोर्टात धाव घेतली होती. तर ईडीने त्याला आक्षेप घेतला होता. आता कोर्टानेच या दोन्ही नेत्यांना मतदानाची परवानगी नाकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. उच्च न्यायालयनेही सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्यास आघाडीची मते दोनने घटणार आहेत. त्यामुळे आघाडीचं टेन्शन वाढलं आहे.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता यावं म्हणून राष्ट्रवादीने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर काल सुनावणी झाली होती. कोर्टाने आज त्यावर निर्णय देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, कोर्टाने आता ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आघाडीला धक्का बसला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे मलिक आणि देशमुख यांना मतदान करता येणार नाही. परिणामी त्यांची दोन मते घटणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीची उच्च न्यायालयात धाव

दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर आता राष्ट्रवादीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वेळ अत्यंत कमी असल्याने उच्च न्यायालयात आजच त्यावर सुनावणी होते की उद्या त्यावर सुनावणी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.. राज्यसभा निवडणुकीला अवघा एक दिवस बाकी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं टेन्शन वाढलं आहे.

कायद्यात काय म्हटलंय?

राष्ट्रपती पदाची निवडणूक होती. ती 2017 मध्ये झाली होती. मात्र 27 एप्रिल 2019 रोजी निवडणूक आयोगाने आपले नियम अद्ययावत करुन नवीन नियमावली आपल्या वेबसाईटला टाकली आहे. त्यामुळे देशमुख आणि मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

भुजबळांनीही मतदान केलं होतं

जुलै 2017मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली होती. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मैदानात होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि रमेश कदम हे तुरुंगात होते. या दोन्ही नेत्यांना मतदान करण्याची कोर्टाने परवानगी दिली होती. त्याच धर्तीवर राष्ट्रवादीने कोर्टात युक्तिवाद करत मलिक आणि देशमुखांना मतदान करू देण्याची विनंती कोर्टाला केली होती.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.