CBI raid on Anil Deshmukh Live : सीबीआयचा राजकीय वापर होताय : जयंत पाटील

| Updated on: Apr 24, 2021 | 11:26 PM

Anil Deshmukh 100 crore case : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (CBI raid on Anil Deshmukh) यांच्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने गुन्हा दाखल करुन छापेमारी केली.

CBI raid on Anil Deshmukh Live : सीबीआयचा राजकीय वापर होताय : जयंत पाटील
Anil Deshmukh CBI raid

नागपूर/ मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (CBI raid on Anil Deshmukh) यांच्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने गुन्हा दाखल करुन छापेमारी केली.  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर, देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सीबीआयच्या विविध पथकांनी देशमुख यांच्या तब्बल 10 ठिकाणांवर छापे मारले. सीबीआयचे अधिकारी PPE किट घालून ही छापेमारी केली.

दरम्यान जवळपास दहा तासांच्या झाडाझडतीनंतर सीबीआयचे अधिकारी, अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरातून बाहेर पडले. यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या.

(Anil Deshmukh house and office raid by CBI live news in marathi today Maharashtra former home minister booked by Central Bureau of Investigation)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Apr 2021 10:48 PM (IST)

    सीबीआयचा राजकीय वापर होताय : जयंत पाटील

    सांगली : अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने केलेल्या कारवाई प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. “देशातील आणि राज्यातील कोविडमुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्यावरून लक्ष हटवण्यासाठी आणखी एक प्रयत्न करत अनिल देशमुखांच्या मागे सीबीआय लावली आहे. देशमुख यांच्या मागे लागण्यापेक्षा हा वेळ जर कोविडला भारतातून बाहेर काढण्यासाठी दिला असता तर चांगली परिस्थिती देशात राहिली असती. देशमुख यांच्यावर दाखल केलेली FIR ही अंत्यत भोंगळ स्वरूपाची आणि मर्यादेचा भंग करून जे सांगितले नाही त्या विषयाला स्पर्श करणारी आहे. सीबीआय आपल्या मर्यादा ओलांडून महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. सीबीआयचा राजकीय वापर होतोय. राज्यात मोघलाई लागलीय असे वाटावे असा हा आजच्या अनिल देशमुख यांच्या झालेल्या कारवाईच्या प्रकारावरून वाटते. अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयला 100 टक्के काहीच सापडले नसेल. त्यामुळे FIR दाखल केला. अनिल देशमुख यांच्या घरावर छापेमारी करण्यासाठीच आधी FIR दाखल केली मग छापेमारी सत्र सुरू केले”, असं जयंत पाटील म्हणाले.

  • 24 Apr 2021 10:05 PM (IST)

    अडीच तासांच्या चौकशीनंतर सीबीआय पथक देशमुखांच्या घराबाहेर

    अनिल देशमुख यांच्या घरी पुन्हा सीबीआय पथक दाखल झाले. त्यामुळे त्यांना काटोल येथे न जाता अर्ध्या वाटेवरुन घरी परतावं लागलं होतं. त्यानंतर सीबीआयच्या सहा जणांच्या पथकाने देशमुख यांची जवळपास अडीच तास चौकशी केली. या चौकशीनंतर देशमुख काटोलला निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  • 24 Apr 2021 08:02 PM (IST)

    सीबीआय टीम पुन्हा अनिल देशमुखांच्या घरी दाखल, कोव्हिड सेंटरच्या पाहणीसाठी निघालेले देशमुख घरी परतले

    सीबीआयची टीम पुन्हा एकदा अनिल देशमुख यांच्या घरी दाखल झाली आहे. त्यामुळे काटोलला कोव्हिड सेंटरची पाहणी करण्यासाठी निघालेले अनिल देशमुख पुन्हा आपल्या घरी परतले आहेत. दहा तासांच्या चौकशीनंतर पुन्हा सीबीआय टीम देशमुख यांच्या घरी आली.

  • 24 Apr 2021 06:50 PM (IST)

    Anil Deshmukh reaction : सीबीआयला सहकार्य केलं, आता कोव्हिड सेंटरला निघालोय : अनिल देशमुख

    सीबीआयची टीम घरी सर्च करायला आली होती. त्यांना आम्ही सहकार्य केलं. आता मी नागपूरमध्ये जो कोरोना वाढतोय, तिकडे कोव्हिड सेंटरला भेट देण्यासाठी मी जात आहे.

  • 24 Apr 2021 06:50 PM (IST)

    सीबीयची टीमने शोध घेतला, त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केलं- अनिल देशमुख

    सीबीयची टीम माझ्या घरी आली होती. मी त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. सध्या कोरोना वाढला आहे. त्यामुळे मी आता नागपूरमध्ये कोविड सेंटरला भेट द्यायला जात आहे.

  • 24 Apr 2021 06:35 PM (IST)

    CBI raid on Anil Deshmukh : दहा तासांच्या झाडाझडतीनंतर सीबीआय टीम बाहेर

    अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू सीबीआयच्या ताब्यात, प्रिंटर आणि वस्तू पांढऱ्या कपड्यात बांधून अधिकाऱ्यांच्या ताब्यात. PPE किट घालून अधिकारी अनिल देशमुखांच्या घरात. जवळपास 10 तास चौकशी केल्यानंतर सीबीआयचे अधिकारी अनिल देशमुखांच्या घरातून बाहेर पडली

  • 24 Apr 2021 05:54 PM (IST)

    पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त वर्षा बंगल्यावर

    पोलीस महासंचालक संजय पांडे आणि मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे वर्षा बंगल्यावर दाखल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन्ही अधिकाऱ्यांची चर्चा सुरू, पोलीस महसंचालक संजय पांडे आज दुसऱ्यांदा वर्षा बंगल्यावर

  • 24 Apr 2021 03:09 PM (IST)

    ज्ञानेश्वरी बंगल्यावरून सीबीआय टीम निघाली

    अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावरून सीबीआय टीम निघाली. तीन गाड्यांमधून सीबीआयचे अधिकारी बाहेर पडले. सकाळपासून अनिल देशमुख यांची सीबीआयकडून चौकशी

  • 24 Apr 2021 01:39 PM (IST)

    CBI raid live : सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जातंय : नवाब मलिक

    सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जातंय. माजी गृहमंत्र्यांना बदनाम करणे हा सगळा खेळ सुरू आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. खरे काय आहे ते बाहेर येईलच आणि जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर उघड होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

  • 24 Apr 2021 11:10 AM (IST)

    Anil Deshmukh case live : अनिल देशमुख यांच्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

    अनिल देशमुख यांच्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

  • 24 Apr 2021 11:05 AM (IST)

    Hasan Mushrif on Anil Deshmukh : ही तर सोची समझी चाल

    ही सोची समझी चाल आहे हे मी आधीच सांगितलं होतं. एका पत्रावरून इतकी मोठी कारवाई होऊ शकते का? हा अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीला बदनाम करण्याचं कारस्थान आहे. माझ्यासह अन्य नेत्यांच्या मागे ED चौकशी लावली, लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल. देशमुख यातून निर्दोष बाहेर पडतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

  • 24 Apr 2021 10:55 AM (IST)

    Anil Deshmukh CBI raid : लाज न बाळगणाऱ्या अनिल देशमुखांना तुरुगात जावं लागेल : मनोज कोटक

    भ्रष्टाचार करताना कुठलीही लाज न बाळगणाऱ्या अनिल देशमुखांना तुरुगात जावं लागेल. भाजप खासदार मनोज कोटक यांची सणसणीत टीका. अनिल देशमुख हे खुर्चीला चिटकून बसणारे वसुली मंत्री होते. कोरोना काळात जनतेच्या पैशांचे वाटेकरी कोण हे सगळ्यांना माहीत आहे. आज अनिल देशमुखावर सीबीआयमार्फत कारवाई, उद्या इतर वाटेकऱ्यांचीही नावे समोर येतील, अशी टीका खासदार मनोज कोटक यांनी केली.

  • 24 Apr 2021 10:53 AM (IST)

    CBI raid live : गृहमंत्री वळसे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील सीबीआयच्या धाडीनंतर महाविकास आघाडीत खलबतं, वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

  • 24 Apr 2021 10:49 AM (IST)

    CBI Raid on Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या 10 ठिकाणांवर छापे

    सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

  • 24 Apr 2021 10:48 AM (IST)

    CBI raid live : आधी 100 कोटी टार्गेट प्रकरणात चौकसी, आता थेट FIR दाखल

    100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Published On - Apr 24,2021 10:59 PM

Follow us
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.