अनिल देशमुख मुंबईतच क्वॉरंटाईन होते, कुणालाच भेटले नाही; नवाब मलिक यांचा दावा
गृहमंत्री अनिल देशमुख हे नागपूरला होम क्वॉरंटाईन होते असं आम्ही कधीच म्हटलं नाही. (anil deshmukh never met anybody in home isolation period, says nawab malik)
मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख हे नागपूरला होम क्वॉरंटाईन होते असं आम्ही कधीच म्हटलं नाही. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते नागपूरहून थेट मुंबईला आले होते. मुंबईत क्वॉरंटाईन असण्याच्या काळात ते कुणालाच भेटले नाहीत, असं सांगतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. (anil deshmukh never met anybody in home isolation period, says nawab malik)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. फडणवीसांचे हे सर्व आरोप नवाब मलिक यांनी आज खोडून काढले. फडणवीसांनी सांगितलेल्या पोलीस दलाच्या कामकाजातील दैनंदिन अहवालातील माहिती चुकीची असल्याचंही मलिक म्हणाले. फडणवीसांनी आज चुकीची माहिती दिली आहे. अनिल देशमुख यांना 5 तारखेला डिस्चार्ज मिळाला. त्यावेळी त्यांनी कोणतीही पत्रकार परिषद घेतली नाही. घरी जात येत असताना रुग्णालयाच्या गेटवर त्यांना पत्रकारांनी अडवले. थकवा होता म्हणून रुग्णालयाच्या गेटवरच बसून त्यांनी मीडियाशी संवाद साधला, असं सांगतानाच देशमुख हे नागपूरमध्ये क्वॉरंटाईन होते असं आम्ही म्हटलं नाही. ते मुंबईत क्वॉरंटाईन होते. डिस्चार्ज झाल्यावर ते खासगी विमानाने मुंबईत आले होते. त्यानंतर मुंबईत त्यांच्या शासकीय निवासस्थानी 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत होते. या काळात ते कुठेही गेले नाहीत. कुणालाही भेटले नाहीत. सह्याद्रीवरही गेले नाहीत. त्या काळात त्यांची कोणतीही मुव्हमेंट झाली नाही. फक्त रात्री त्यांच्या बंगल्याच्या आवारात व्यायाम करायला जायचे एवढीच त्यांची मुव्हमेंट होती, असं मलिक म्हणाले.
हिंदीतून पत्रकार परिषद का?
फडणवीसांनी आज हिंदीत पत्रकार परिषद सुरू केली. मराठीऐवजी हिंदीतून पत्रकार परिषद सुरू करत असल्याबद्दल त्यांनी दिलगीरीही व्यक्त केली. परंतु, हिंदीतून पत्रकार परिषद घेण्यामागचा त्यांचा काय हेतू आहे, हे उघड आहे, असं सांगतानाच काल शरद पवार यांनी चुकीची माहिती दिल्याचं फडणवीस सांगत आहेत. पण त्यावर गृहमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रश्मी शुक्लांचा अहवाल खोटा
बदल्यांबाबतचा तत्कालिन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या अहवालाबाबत फडणवीस सांगत आहेत. बदल्यांसाठी पैसे घेण्यात आल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. या अहवालात ज्या लोकांच्या बदल्यांसाठी पैसे घेण्यात आला आहे. तो खोटा आहे. ज्या लोकांची अहवालात नावं आहेत. त्यापैकी 80 टक्के लोकांच्या बदल्या झाल्याच नाहीत, असं सांगतानाच पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी आयपीएस अधिकाऱ्याचं बोर्ड असतं. या बोर्डात आयपीएस अधिकारी आणि सचिव असतात. त्यांच्या शिफारशीनंतर हा अहवाल गृहमंत्र्यांकडे जातो. गृहसचिवांच्या शिफारशीनंतर हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे जातो आणि नंतर बदल्यांची ऑर्डर निघते. कोणताही मंत्री थेट बदल्याची ऑर्डर काढत नाही, असं सांगतानाच शुक्ला यांचा अहवालच खोटा असल्याचं ते म्हणाले. तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या समितीने शिफारस केल्यानंतरच पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट
रश्मी शुक्ला यांनी कोणतीही परवानगी न घेता राजकारण्यांचे फोन टॅप केले. राज्यात सरकार बनवण्याचं संकट असताना त्यांनी राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले. त्यांना फोन टॅप करण्याची सवय लागली होती. त्या भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या, असं सांगतानाच त्यांनी बेकायदा फोन टॅप केल्यानेच त्यांना वेगळं डिपार्टमेंट देण्यात आल्याचं मलिक म्हणाले. फडणवीस हे सरकारला बदनाम करण्याचं काम करत आहेत. हा खोटा डेटा घेऊन ते केंद्रीय गृहसचिवांकडे जात आहेत. राज्य सरकार कसे पडेल यासाठीच त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले. (anil deshmukh never met anybody in home isolation period, says nawab malik)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 23 March 2021https://t.co/MJ50aPsBnH
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 23, 2021
संबंधित बातम्या:
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या ‘त्या’ अहवालाची सीबीआय चौकशी करा; फडणवीस आज केंद्रीय गृहसचिवांना भेटणार
अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी काय करत होते?; फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट
रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट, त्यांचा अहवाल खोटा; नवाब मलिकांचा दावा
(anil deshmukh never met anybody in home isolation period, says nawab malik)