अनिल परब ‘म्हाडा’ला भिडले, लेखी पुरावा घेऊन आले, आता रस्त्यावर लढाईचा एल्गार, चार तासांत असं काय घडलं?

अनिल परब (Anil Parab) तब्बल चार तासांनी म्हाडाच्या कार्यालयाबाहेर आले. त्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya), म्हाडा (Mahada) अधिकाऱ्यांवर निशाणा साधला.

अनिल परब 'म्हाडा'ला भिडले, लेखी पुरावा घेऊन आले, आता रस्त्यावर लढाईचा एल्गार, चार तासांत असं काय घडलं?
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 5:39 PM

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांचं काल वांद्रे येथील म्हाडा वसाहतीमधील कार्यालय पाडण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलंय. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हाडाकडून अनिल परब यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. पण या घटनेनंतर अनिल परब आज स्वत: म्हाडाच्या कार्यालयात गेले. म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत अनिल परबांची बराच वेळ बैठक झाली. अनिल परब तब्बल चार तासांनी म्हाडाच्या कार्यालयाबाहेर आले. त्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या, म्हाडा अधिकाऱ्यांवर निशाणा साधला. किरीट सोमय्या यांनी आपली बदनामी केली. तसेच आपल्याला नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली. यासाठी आपण मुंबई हायकोर्टात जाणार असल्याचं अनिल परब यांनी सांगितंल.

‘जागा माझी नाही तर सोसायटीची’

“गेले दीड वर्ष किरीट सोमय्या माझ्यावर जे आरोप करत होते आणि सांगत होते की, हे अनिल परब यांचं अनधिकृत कार्यालय आहे. मी त्याबाबतीत वारंवार सांगत होतो की, ही जागा माझी नाही. ही जागा सोसायटीची आहे. सोसायटीचं ते कार्यालय आहे. ते कार्यालय वापरण्याची परवानगी मला सोसायटीने दिलेली आहे”, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

‘अनधिकृत बांधकामाशी माझा संबंध नाही’

“माझं हे अनधिकृत कार्यालय आहे, असं किरीट सोमय्या आरोप करत होते. पण हा आरोप सपशेल खोटा आहे. या संदर्भात म्हाडाने मला लेखी स्वरुपात स्पष्टीकरण दिलेलं आहे. कार्यालयाच्या जागेचा, अनधिकृत बांधकामाशी माझा कोणताही संबंध नाही”, असं अनिल परब म्हणाले.

“म्हाडाने पहिल्या पॅरेग्रामध्ये ठळक अक्षरांत लिहिलं आहे की, गांधीनगर वांद्रे पूर्व येथील इमारत क्रमांक ५७-५८ या दोन इमारतीच्या जागेत करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाशी आमदार अनिल परब यांचा संबंध आढळून येत नाही”, असं अनिल परब यांनी वाचून दाखवलं.

“किरीट सोमय्या जे गेले कित्येक वर्ष माझ्यावर खोटे आरोप करत आहेत त्यांच्यावर मी अब्रुनुकसानीचा दावा केलाय. त्याचा लेखी पुरावा आज म्हाडाने दिलाय”, असं अनिल परब यांनी सांगितलं.

‘किरीट सोमय्या आज तोंडावर पडले’

“म्हाडा कार्यालयामध्ये २७ जून २०१९ रोजी अनिल परब यांच्या नावे जाहीर केलेली नोटीस आम्ही मागे घेतलेली आहे. या दोन गोष्टींचा अर्थ असा होतो, किरीट सोमय्या केवळ जाणूनबुजून मला बदनाम करण्यासाठी माझ्यावर आरोप करत आहेत. ते आरोप म्हाडाने खोटे ठरवले आहेत. म्हाडाने मला लेखी लिहून दिलं आहे. याचा अर्थ असा आहे की, किरीट सोमय्या खोटे बोलत आहेत. किरीट सोमय्या आज तोंडावर पडले आहेत”, अशी टीका अनिल परब यांनी केली.

“मूळ प्लॅनच्या बाहेर जे बांधकाम केलं जातं ते अनधिकृत असतं. मी मूळ बांधकामाच्या नकाशाची कॉपी मागितलेली आहे. पण ती कॉपी म्हाडाकडे उपलब्धच नाही. नकाशाची कॉपी म्हाडाकडे नसल्यामुळे हे बांधकाम अनधिकृत कशाच्या आधारावर म्हणता येईल? असा प्रश्न उपस्थित होतोय”, असं अनिल परब म्हणाले.

“त्यांनी आम्हाला सांगितलंय की, आम्ही सगळं तपासून पाहतो. असेल तर सादर करतो. मूळ बांधकामाचे नकाशे मिळाले नाहीत तर मी म्हाडावर हक्कभंग दाखल करेन. कोर्टात जाईन अशाप्रकारच्या नोटीस केवळ त्रास देण्यासाठी दिल्या जात असल्याचं सांगेन”, असं अनिल परब म्हणाले.

अनिल परब आणखी काय-काय म्हणाले?

“तिसरा मुद्दा माझा असा आहे की, साठ दिवसांत रेगुलरायझेनचा अर्ज मंजूर केला नाही तर त्याला डिम्प मंजूर समजला जातो. मी जे अगोदर म्हाडाला पत्र दिलं होतं त्या पत्राच्या आधारावर मी त्यांना सांगितलं होतं की त्याचे ६० दिवस झाले आहेत. म्हणून हा अर्ज डिम्प मंजूर आहे, असं समजतो.”

“या सगळ्या इमारती पुनर्विकासासाठी जात आहेत. त्यामुळे आम्ही ते स्ट्रक्चर काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही असा निर्णय सांगितल्यानंतरही त्यांच्या अधिकाऱ्यांनी खोटा अहवाल दिलेला आहे. बांधकाम काढण्याचं काम चालू होतं. त्याचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत. असं असताना यांच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम काढण्यात आलेलं नाही, असं म्हटलं आहे. याचाच अर्थ खोटा अहवाल दिला. त्याच्याच आधारावर मला नोटीस दिली. हे सगळं मी कागदोपत्री ठेवले आहेत.”

“मी याप्रकरणी म्हाडाच्या विरोधात हायकोर्टात जाणार आहे. ज्या अधिकाऱ्याने मला म्हाडाची खोटी नोटीस दिली, कोणतीही शहानिशा न करता नोटीस दिली त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. माझ्या आमदारकीच्या अधिकाऱ्याचा भंग झालेला आहे.”

“पुढच्या आठ दिवसांत मला नकाशे मिळाले नाहीत तर मी कायदेशीर कारवाई करेन.”

“या कारवाईच्या आधारावर म्हाडाच्या ५६ वसाहतींमधील जी छोटी-मोठी बांधकामं झाली असतील त्यांच्या मनात भीती निर्माण झालीय. या सगळ्यांना एकत्र करुन त्यांच्या घरावर हातोडा पडणार नाही याची जबाबदारीदेखील मला घ्यावी लागेल.”

“मी या सगळ्यांना एकत्र करेन आणि किरीट सोमय्या यांना जाब विचारेन. त्यांना हे भाजपने दिलेलं काम आहे का? की त्यांच्या कृतीला भाजपचं समर्थन आहे का? गरिबांचं घरं तोडणं योग्य नाही. ज्या गरिबांच्या घरात आज भाजपचेदेखील कार्यकर्ते राहतात उद्या त्यांची देखील घरं तोडली जाऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या कारवाईला भाजपचं समर्थन आहे की नाही हे त्यांनी सांगावं, त्या पद्धतीने कारवाई केली जाईल.”

“मी यंत्रणांना उत्तर देणं बांधिल आहे. किरीट सोमय्यांना मानत नाही. हा प्रश्न गरिब लोकांचा आहे. गरिबांच्या पाठिशी मी आणि शिवसेना उभे राहू.”

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.