‘सुपारीबाज तुम्ही आहात, माझा नवरा खूप कमवतो, टॅक्सपण भरतो’, दमानिया यांचं भुजबळांना प्रत्युत्तर
"मी गृहमंत्र्यांना घेऊन या कुटुंबाला भेटायला गेले होते. मी फडणवीसांना मेसेज केला. मी 6 आणि 7 तारखेला भेटायला गेले. महाराष्ट्र सदनचे जे पैसे फिरवले ते परवेशमध्ये केले. एका भाजीवाल्याकडे इवडे पैसे येऊ कसे शकतात? भुजबळ सत्तेत आहेत म्हणून फडणवीस त्यांची पाटराखण करत आहेत", असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.
गोविंद ठाकुर, Tv9 मराठी, मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ यांच्यावर टीका केली. “मुंबईच्या सांताक्रुझ पश्चिम येथील मंत्री छगन भुजबळ यांची इमारत ही फर्नांडीस यांच्या कुटुंबाच्या जागेवर उभी आहे. छगन भुजबळ यांनी फर्नांडिस कुटुंबाचे घर लुटले आहे. भुजबळांच्या इमारतीच्या ठिकाणी 1994 मध्ये फर्नांडिस यांचा बंगला होता. तो बंगला फर्नांडिस कुटुंबाने पुनर्विकासासाठी रहेजा यांना दिला. या बंगल्याच्या ऐवजी फर्नांडिस यांच्या कुटुंबाला 5 फ्लॅट मिळणार होते. पण त्यांना ते मिळाले नाहीत. तसेच फर्नांडिस कुटुंबाची जागा समीर भुजबळ यांच्या परवेज कन्स्ट्रक्शनला परस्पर विकला गेला”, असा दावा अंजली दमानिया यांनी केला. फर्नांडिस कुटुंबाने अनेकदा समीर भुजबळांची भेट घेतली. पण फर्नांडिस कुटुंबाला एक रुपयाही परतफेड देण्यात आली नाही, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
“परवेश कंपनी ही समीर भुजबळांची आहे आणि त्या कंपनीनं तिथं इमारत बांधली. तेव्हा मी आरोप केले होते की समीर भुजबळ यांनी ही जागा लाटली. समीर भुजबळ कालच्या पत्रकार परिषदेत खोटं बोलले. त्यांनी सांगितलं की, आम्ही 2003 मध्ये त्यांना पैसे देत होतो त्यांनी सांगितले की या कुटुंबाने तेव्हा उत्तर दिले नाही. त्यांनी सांगितले की, दमानियाबाई सुपारीबाज आहे. माझा नवरा खूप कमावतो आणि टॅक्सपण भरतो. तुमच्या सारखा नाही. सुपारीबाज लोक तुम्ही आहात. तुमच्या विरोधात कधीच एफआर झाला पाहीजे होता”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
‘5 फ्लॅट अजून का दिले नाहीत?’
“फर्नांडिस यांचा जो बंगला होता तो वडिलांचा होता आणि त्यांना तीन मूलं होती. पुढे पॉवर एटॉर्नीमध्ये यांच्यावर सगळे होल्ड आले. तसेच यांच्या बहिणीने हेच केले. समीर भुजबळ काल सांगत होते की, आम्हाला सहनभूती वाटत होती म्हणून आम्ही त्यांना पैसे देणार होतो. पण कधी पैसे दिले? तुम्ही यांना 5 फ्लॅट देणार होते. ते अजून का दिले नाहीत?”, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.
“तुम्हाला ती इमारत हडप करायची होती. तुम्ही वाट बघत होते. मी आले 2016 मध्ये, यांनी मला कोर्टात सांगितले. तुमच्यासारखे लोक कोणत्याही पक्षात जातात आणि ईडीपासून वाचतात. तुम्ही, अजित पवार, तटकरे सगळे सत्तेसाठी…”, अशी टाका अंजली दमानिया यांनी केली. “काल ते असेही म्हणाले, ही प्रॉपर्टी अटॅच केली आहे, म्हणून पैसे देत नाही. ईडीने रेजिस्ट्री थांबविली आहे. तुम्हाला अखंड इमारत हवी आहे म्हणून पैसे दिले नाही. 8.5 कोटी कोटी देणार होते. तुम्ही ड्राफ्टने 4.5 कोटी देऊ आणि बाकी पैसे ट्रस्टने देऊ. तुम्ही म्हणाले पैसे द्यायला मी थांबविलं. मी कधी थांबवलं?”, असा सवाल दमानिया यांनी केला.
अंजली दमानिया यांचा मोठा इशारा
“खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक झाली. यांच्या काही कागदपत्रात सह्या नाहीत. अधिकाऱ्यांनी विनासही कसे डॉक्युमेंट रजिस्टर केले? आम्हाला डिटेन केले होते. हे घर अजूनही त्यांच्या नावावर आहे. त्यामुळे त्यांचे पैसे द्या. तुम्ही पैसे दिले नाही तर आम्ही तिथे बाहेर बसू”, असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला.
“डोरेन नावाचा व्हाट्सअॅप ग्रुप होता, असं तुम्ही म्हणाला होता. सुप्रिया सुळे यांनी हा ग्रुप बनविला होता. त्यात फक्त पैसे कसे देणार? यावर चर्चा झाली. मी कोणते राजकारण करते असे म्हणतात. मी कोणत्या पक्षात होते? आम्ही लोकांसाठी काम करतो. तुम्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे राजकारण, ऊस कारखाने तुमचे, सगळं तुमचं, आम्ही एक रुपया घेत नाहीत. मी विनंती करते की वन शॉट पेमेंट आरटीजीएस आणि डिमांड ड्राफ्टमधून द्या. त्यांच्या खात्यात पैसे द्या”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
‘तुम्ही ट्रस्टने पैसे देणार म्हणजे स्कॅमने पैसे देणार’
“आम्ही 2016ची चार्जशिटची कॉपी मागणार आहोत. आम्ही परवानगी मागून त्यांच्या घरासमोर शांत बसू. उलट पोलिसांनी आम्हाला प्रोटेक्शन द्यावे. तुम्ही ट्रस्टने पैसे देणार म्हणजे स्कॅमने पैसे देणार. तुमचे घोटाळे हे आहेत”, अशी टीका अंजली दमानिया यांनी केली.
‘सुप्रिया सुळेंनी 5 मीटिंग लावल्या’
“सुप्रिया सुळे यांनी 5 मीटिंग लावल्या होत्या. तिथे भुजबळ वेळकाढूपणा करत होते. 2 ड्राफ्ट यांना जे पाठविले ते 2009 मध्ये, मी स्वतः ताईवर चिडली होती की तुमच्या पक्षातला नेता तुमचे ऐकत नाही. मी खरे आहे की नाही ते सुप्रिया सुळेंना विचारा. 4 नोव्हेंबर 2023 ला बोलणे झाले होते. ईडीच्या कारणात काही तथ्य नाही”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
‘एका भाजीवाल्याकडे इवडे पैसे येऊ कसे शकतात?’
“मी गृहमंत्र्यांना घेऊन या कुटुंबाला भेटायला गेले होते. मी फडणवीसांना मेसेज केला. मी 6 आणि 7 तारखेला भेटायला गेले. महाराष्ट्र सदनचे जे पैसे फिरवले ते परवेशमध्ये केले. एका भाजीवाल्याकडे इवडे पैसे येऊ कसे शकतात? भुजबळ सत्तेत आहेत म्हणून फडणवीस त्यांची पाटराखण करत आहेत”, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.
‘मुख्यमंत्र्यांनी फोन उचलला नाही’
“तुम्ही लूट करता? असे जाब फडणवीसांनी का नाही विचारले? त्यांना मंत्री कसे बनविले? मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल फोन केला होता. मला असे वाटले की ते बोलतील की पैसे द्या किंवा राजीनामा द्या. पण त्यांनी फोन उचलला नाही”, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली.