Chemical Khichdi: ‘केमिकल खिचडी’तील सात थेरपी मानसिक आरोग्यासाठी सर्वोत्तम; मान्यवरांकडून कौतुक
Chemical Khichdi: या पुस्तकाला प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
मुंबई: बायोपोलरिटीचा फक्त 1 टक्का व्यक्तींवर परिणाम होऊ शकतो, पण मानसिक आरोग्य आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. माझ्या मते, कोणत्याही मानसिक आरोग्यविषयक (mental health) आव्हानावर मात करण्यासाठी वैद्यकीय थेरपी, प्रेमळ थेरपी व जीवनशैली या तीन थेरपी आवश्यक आहेत. या तीन थेरपींशिवाय मला माझ्या स्थितीवर नियंत्रण ठेवणे अवघड झाले असते. सहयोगी, सहानुभूती थेरपी, वर्क थेरपी, सेल्फ-थेरपी व आध्यात्मिक थेरपी या उर्वरित चार थेरपींनी मला जगण्यापासून समृद्धीकडे नेले आहे, असं लेखिका व स्तंभलेखिका अपर्णा पीरामल राजे (aparna piramal raje ) यांनी सांगितलं. अपर्णा यांनी मानसिक आरोग्य सुधारण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी या सात थेरपीज कशाप्रकारे उपयुक्त ठरू शकतात याबाबतचीही माहिती दिली. अपर्णा पीरामल राजे यांच्या ‘केमिकल खिचडी: हाऊ आय हॅक्ड माय मेण्टल हेल्थ’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. तसेच ‘केमिकल खिचडी’ (chemical khichdi) हे पुस्तक मानसिक आरोग्य सुधारणाऱ्यासांठी सर्वोत्तम पुस्तक असल्याचं कौतुक सर्वांनी केलं.
महामारीनंतर मानसिक आरोग्य स्थितींमध्ये वाढ झाली आहे, पण या आव्हानांसाठी उपायांचा शोध घेणे अवघड आहे. या पार्श्वभूमीवर अपर्णा पीरामल राजे यांचं हे पुस्तक सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारं आहे. अपर्णा या शिक्षण व परोपकारी कार्यामध्ये वाढत्या रूचीसह यूकेच्या फायनान्शियल टाइम्समध्ये माजी योगदानकर्ता व सार्वजनिक वक्ता देखील आहेत. व्हीआयपी इंडस्ट्रीजच्या उपाध्यक्ष आणि अपर्णा यांच्या बहीण राधिका पीरामल यांनी या कार्यक्रमामध्ये बीजभाषण केले. तसेच त्यांच्या कुटुंबियांनी अपर्णा यांची बायोपोलरिटी, त्यांचा उत्साह, नैराश्य व मूडमध्ये होणारा बदल कशापकारे समजून घेतला व त्याचे व्यवस्थापन केले असल्याचं राधिका यांनी सांगितलं. तसेच त्यांनी पुस्तकाचे लेखन करण्यामागील त्यांच्या प्रेरणांबाबत देखील माहिती दिली.
‘केमिकल खिचडी’ आशादायी
अंशत:-स्मरण, अशंत:-अहवाल व अंशत: स्वयं-मदत मार्गदर्शक ‘केमिकल खिचडी’ हे मानसिक आरोग्य सुधारू पाहणाऱ्या व्यक्तींसाठी आशादायी व सहाय्यक मार्गदर्शक आहे. हे पुस्तक दोन विभागांमध्ये विभागण्यात आले आहे. पहिला विभाग आहे स्मरण, जे स्वत: लेखिकेच्या वास्तविक जीवनामधील अनुभवांची आणि त्या दोन दशकांहून अधिक काळापासून बायोपोलर विकृतीसह कशाप्रकारे जगण्यास शिकल्या याबाबतची माहिती देते. दुस-या विभागामध्ये त्यांनी सात आवश्यक थेरपींचा उल्लेख केला आहे, ज्या मानसिक आरोग्यविषयक आजार असलेल्या व्यक्ती, त्यांचे कुटुंबिय, मित्र, सहकारी, वैद्यकीय व्यावसायिक आणि त्यांच्यावर प्रेम करण्यासोबत त्यांची काळजी घेणाऱ्या इतरांना मदत करू शकतात.
सात थेरपी जगण्याचा मार्ग दाखविणाऱ्या
या पुस्तकाला प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी प्रस्तावना लिहिली आहे. पुस्तकातील सात थेरपी प्रत्येकासाठी सर्वसमावेशक आणि संवर्धनाच्या मार्गाने सामना करण्याचा, जगण्याचा व बरे करण्याचा मार्ग दाखवतात. हे पुस्तक काळजी घेणाऱ्यांसाठी जेवढे आहे तेवढेच ते मानसिक आरोग्याच्या स्थितीचा सामना करणाऱ्यांसाठी देखील आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या जीवनात कोणालातरी ओळखतो, जो कोणत्या ना कोणत्या मानसिक आरोग्याच्या स्थितीशी झुंज देत आहे, असं आनंद महिंद्रा म्हणाले.
सात थेरपी कुणीही वापरू शकतो
‘टॉक टू मी’ या मानसिक आरोग्य ना-नफा तत्त्वावर आधारित संस्थेचे संस्थापक नरेंद्र किंगर यांनी या कार्यक्रमात भाषण केले. सात थेरपीसार्वत्रिक स्वरूपाच्या आहेत आणि जीवनाच्या सर्व पार्श्वभूमींमधील व्यक्ती या थेरपींचा अवलंब करू शकतात, असं किंगर यांनी स्पष्ट केलं. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला निसा गोदरेज, आनंद पिरामल, अजय पिरामल, स्वाती पिरामल, निरंजन हिरानंदानी, राज्याचे प्रिन्सिपल सचिव भूषण गगराणी, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, अभिजीत अवस्थी, राज मारिवाला, तारा शर्मा, अपर्णा पोपट, अंजली भन्सल, हेमेंद्र कोठारी, डॉ. रमन देशपांडे, डॉ. अविनाश आणि डॉ. वर्षा फडके, डॉ. रुमी बेरामजी, भारत दोषी, परेश सुखटनकर, अश्विन आणि इना दानी आदी उपस्थित होते.