जनआशिर्वाद कशासाठी? इंधन, गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की महागाई वाढवली म्हणून, जयंत पाटलांचा सवाल
जनआशिर्वाद यात्रा कशासाठी? पेट्रोल - डिझेलच्या आणि घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की, महाराष्ट्रात व देशात महागाई वाढवली म्हणून...? जनतेने यांना आशिर्वाद कशासाठी द्यायचा? असा थेट सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई : जनआशिर्वाद यात्रा कशासाठी? पेट्रोल – डिझेलच्या आणि घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की, महाराष्ट्रात व देशात महागाई वाढवली म्हणून…? जनतेने यांना आशिर्वाद कशासाठी द्यायचा? असा थेट सवाल जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विचारला आहे. भाजपने सुरु केलेल्या जनआशिर्वाद यात्रेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. (As inflation has risen in the country, So you are Organizing jan ashirwad yatra, Jayant Patil Slams BJP)
या देशात कधी केंद्रीय मंत्री झाले नाहीत का? की केंद्रीय मंत्री कोणी कधी पाहिले नाहीत, त्यामुळे ही जनआशिर्वाद यात्रा हास्यास्पद असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.
भाजप जनआशिर्वाद यात्रा घेण्यासाठी जात आहेत. त्यावेळी लोक विचारत आहेत, आता हे मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारायला निघालेले लोक आहेत, त्यामुळे लोकं घाबरतात. आता घरात बसून मतदान येईल त्यावेळी निषेध व्यक्त करतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राणेंच्या वक्तव्याला तुमचं समर्थन आहे काय?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. अशी भाषा महाराष्ट्रात अशी भाषा कधीच कुणी वापरली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा मंत्र्याला कशाच्या आधारे मंत्रिमंडळात घेतले?, असा सवाल करतानाच राणेंच्या वक्तव्याला तुमचं समर्थन करत आहात काय?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध करतानाच भाजपलाही काही सवाल केले. नारायण राणे यांच वक्तव्य निषेधार्य आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल ही भाषा वापरणे चुकीची आहे. राजकारणाचा स्तर खाली गेलाय असं नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेलाय, असा टोला लगावतानाच महाराष्ट्रात शिवसेनेनं जबाबदारीनं वागायचं काम केलंय. कायदा कोणाला हाती घेऊ देणार नाही. राष्ट्रवादी याचं कसलंही समर्थन करणार नाही. गृहखात्याला याबाबत जास्त माहिती आहे. विधानाकडे बघितलं तर परिस्थिती समजू शकतो, असं पाटील म्हणाले.
ते मोदींचच वक्तव्य समाजवं लागेल
राणेंनी केलेलं वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य समजावं लागेल. कारण मोदींनीच त्यांना मंत्री केलं आहे. त्यामुळे राणेंच्या वक्तव्याचं फडणवीस आणि पाटील समर्थन करत आहेत का? असा माझा सवाल आहे, फडणवीस आणि पाटील यांनी भूमिका स्पष्ट करावी. नाही तर देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या मागे भाजप लागल्याचं चित्रं देशात जाईल, असं पाटील म्हणाले.
इतर बातम्या
Varun Sardesai: कोण आहेत वरुण सरदेसाई ज्यांनी राणेंच्या विरोधात मुंबईत रणशिंग फुंकलंय? वाचा सविस्तर
(As inflation has risen in the country, So you are Organizing jan ashirwad yatra, Jayant Patil Slams BJP)