वाझेंना कार घेण्यासाठी पटोले आणि सचिन सावंताची मदत; आशिष शेलार यांचा आरोप

सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना कार घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मदत केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. (ashish shelar alleges congress leaders connection with vazes Mercedes car)

वाझेंना कार घेण्यासाठी पटोले आणि सचिन सावंताची मदत; आशिष शेलार यांचा आरोप
आशिष शेलार, भाजप नेते
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 3:17 PM

मुंबई: सचिन वाझेप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांनी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. वाझे यांना कार घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मदत केल्याचा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. (ashish shelar alleges congress leaders connection with vazes Mercedes car)

आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वाझे प्रकरणावरून काँग्रेस नेत्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. नाना पटोले आणि सचिन सावंत यांनीच कार घेण्यासाटी वाझेंना मदत केल्याची माहिती पुढे येत आहे. आपल्याकडे चौकशीचा अंगुली निर्देश होऊ नये म्हणून या दोन्ही नेत्यांकडून बिनबुडाचे आरोप सुरू आहेत. याची तपास यंत्रणेने चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

हाच का तो ‘किमान समान कार्यक्रम’

एका एपीआयला वाचवण्याची सरकार धडपड का करत आहे, हे आता दिसून आलं आहे. वाझेंच्या गाडीत नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. यावरून हाच का तो ठाकरे सरकारचा ‘किमान समान कार्यक्रम’ आहे का हे दिसून आलं आहे, असा टोला लगावतानाच एका एपीआयला पैसे मोजण्याची मशीन का लागत होती? वाझे ही मशीन घेऊन का फिरत होते? असा सवालही त्यांनी केला.

हिरेन प्रकरणातील रेकॉर्डिंगची स्वतंत्र चौकशी करा

ठाकरे सरकारची हेराफेरी सुरुच अजूनही आहे. रोज नवीन हेराफेरी या ठाकरे सरकारच्या काळात सुरू आहे. एका गुन्ह्याला लपवण्यासाठी दुसरा गुन्हा केला जातोय. मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल तसे शवविच्छेदन करतानाचे रेकाँर्डिग पोलीसांना पूर्णपणे देण्यात आलेले नाही. त्यामध्ये सुध्दा छेडछाड केली जाते आहे की काय ? अशी शंका आहे. त्यामुळे त्याची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

‘त्या’ बड्या अधिकाऱ्याची चौकशी होणार?

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्याच्या कटात सहभाग असल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) लवकरच मुंबई पोलीस दलातील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी केली जाणार आहे. या अधिकाऱ्याच्या चौकशीची परवानगी मिळवण्यासाठी NIA ने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे विचारणा केली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर ‘एनआयए’चे प्रमुख या अधिकाऱ्याची चौकशी करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. या अधिकाऱ्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मात्र, लवकरच मुंबई पोलीस दलातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. ‘एनआयए’ने दोन दिवसांपूर्वीच या अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी तयारी करायला सुरुवात केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, NIA चे तीन वरिष्ठ अधिकारी सोमवारी दिल्लीहून मुंबईत दाखल झाले होते. अधिकारी पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) दर्जाचे असल्याची माहिती मिळत आहे. (ashish shelar alleges congress leaders connection with vazes Mercedes car)

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: NIA चे अधिकारी सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार

VIDEO: वाझेंचा पाय आणखी खोलात, त्या इनोव्हाचं CCTV फुटेज NIA च्या हाती, बघा 24 फेब्रुवारीला इनोव्हा कुठून बाहेर पडतेय?

स्कॉर्पिओ गाडीवर सचिन वाझेंच्या हाताचे ठसे; NIA ने पुरावे दाखवल्यानंतर वाझेंची बोलती बंद

(ashish shelar alleges congress leaders connection with vazes Mercedes car)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.