Juhu Beach Drown : जुहू बीचवर सकाळी सापडले 2 मुलांचे मृतदेह

juhu beach drown : मृतदेह सापडला त्यावेळी त्याच्या डोक्यावर जखमेच्या खुणा होत्या आणि शरीरावर सूज होती. आज सकाळी रुतुजा घई आणि अर्शद अली समुद्रकिनारी मॉर्निंग वॉकसाठी आले होते.

Juhu Beach Drown : जुहू बीचवर सकाळी सापडले 2 मुलांचे मृतदेह
juhu beach
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 8:42 AM

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध जुहू समुद्रकिनारी सोमवारी संध्याकाळी एक दुर्घटना घडली. बिपरजॉय चक्रीवादळामुळे आधीच समुद्राला उधाण आलं होतं. समुद्र खवळलेला होता. अशा स्थितीत सहामुलं पोहण्यासाठी जुहू समुद्रात उतरली होती. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही मुलं आतमध्ये खेचली गेली. ही मुलं बुडत असताना दोघांना वाचण्यात यश आलं. जीवरक्षक आणि स्थानिकांनी या मुलांना बुडण्यापासून वाचवलं.

पण अन्य चार मुलांचा शोध सुरु होता. चार पैकी दोन मुलांचे मृतदेह आज सकाळी सापडले. रात्री उशिरा एक तर दुसरा मृतदेह पहाटे सापडला. दोन मुलांचा शोध अजूनही सुरू आहे. ही मुल वाकोला परिसरात रहायला आहेत.

त्या दोघांनी पाहिले मृतदेह

आज सकाळी रुतुजा घई आणि अर्शद अली समुद्रकिनारी मॉर्निंग वॉकसाठी आले होते. त्यावेळी त्यांना किनाऱ्यावर मुलाचा मृतदेह दिसला. त्यांनी इतर लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मृतदेह सापडला त्यावेळी त्याच्या डोक्यावर जखमेच्या खुणा होत्या आणि शरीरावर सूज होती.

बिपरजॉय चक्रीवादळ कुठल्या दिशेने?

अरबी समुद्रात घोघवणारं बिपरजॉय चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने सरकलं आहे. गुजरातमध्ये यंत्रणा अलर्ट मोडवर असून मोठ नुकसान होण्याची शक्यता आहे. पुढे हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे हवामानात प्रचंड बदल झाले आहेत. अनेक ठिकाणी पाऊस पडला. मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात समुद्र खवळला आहे. समुद्रात उंचच्या उंच लाटा किनाऱ्यावर येऊन धडकत आहेत. अशा स्थितीत ही मुल पोहण्यासाठी उतरली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.