बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या; शिल्पा शेट्टीला अश्रू अनावर

शनिवारी रात्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे शनिवारी रुग्णालयात सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते.

बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या; शिल्पा शेट्टीला अश्रू अनावर
Shilpa Shetty, Raj KundraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 9:52 AM

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दिकी यांचे पुत्र, आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे इथल्या निर्मलनगर परिसरातील कार्यालयाबाहेरच घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेबद्दल समजताच अभिनेता सलमान खान, शिल्पा शेट्टी, संजय दत्त यांसारखे सेलिब्रिटी शनिवारी रात्रीच लिलावती रुग्णालयात पोहोचले. पापाराझी अकाऊंटवर या सेलिब्रिटींचे व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये शिल्पाला अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळतंय. या घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

शनिवारी रात्री शिल्पा तिचा पती राज कुंद्रासोबत लिलावती रुग्णालयात पोहोचली. यावेळी ती तिचे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करताना दिसली. कारमध्ये बसली असतानाही शिल्पाला रडू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. गाडीतून उतरल्यानंतर फोटोग्राफर्स आणि पत्रकारांना त्यांच्याभोवती घोळका गेला. या घोळक्यातून राज तिला पुढे नेण्यास मदत करतो. यावेळीही शिल्पा प्रचंड दु:खी असल्याचं पहायला मिळालं. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा पती झहीर इक्बालसुद्धा बाबा सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. बाबा सिद्दिकी यांचे बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींसोबत मैत्रीपूर्ण नातं होतं. त्यांच्याकडून आयोजित होणाऱ्या इफ्तार पार्टीत इंडस्ट्रीतील असंख्य सेलिब्रिटी आवर्जून उपस्थित राहतात.

हे सुद्धा वाचा

सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून पळ काढत असलेल्या तिघांपैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मात्र हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस पक्षातून तीन वेळा आमदार आणि 2004-2008 या काळात मंत्री राहिलेले सिद्दिकी यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. राजकीय वर्तुळात प्रसिद्ध असलेले सिद्दिकी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं वृत्त समजताच रात्री उशिरापर्यंत लिलावती रुग्णालयात नेते, कलाकार यांची रीघ लागली होती.

मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीत सिंह दहिया यांनी दोन संशयितांच्या अटकेची माहिती दिली. “निर्मलनगरमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. गोळी लागल्यानंतर सिद्दिकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं होतं. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे”, असं दहिया यांनी सांगितलं. या गुन्ह्यात वापरलेलं हत्यारही जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली. गोळीबारात 9.9 मिमी पिस्तूल वापरण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

'गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून..', राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
'गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून..', राऊतांचा फडणवीसांवर निशाणा.
सिद्दिकींची हत्या; कुठे होणार अंत्यसंस्कार? कूपरमध्ये शवविच्छेदन सुरु
सिद्दिकींची हत्या; कुठे होणार अंत्यसंस्कार? कूपरमध्ये शवविच्छेदन सुरु.
सिद्दिकींची हत्या करणारे बिश्नोई गँगशी सबंधित, तपासातून काय आलं समोर?
सिद्दिकींची हत्या करणारे बिश्नोई गँगशी सबंधित, तपासातून काय आलं समोर?.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 2 आरोपी अटकेत, तिसऱ्याची ओळख पटली
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 2 आरोपी अटकेत, तिसऱ्याची ओळख पटली.
झिशान सिद्दीकी थोडक्यात बचावले, गोळीबाराच्या आधी एक फोन आला अन्...
झिशान सिद्दीकी थोडक्यात बचावले, गोळीबाराच्या आधी एक फोन आला अन्....
अजितदादा गटाचे नेते बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, नेमक काय घडल?
अजितदादा गटाचे नेते बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, नेमक काय घडल?.
बाबा सिद्दीकींवर गोळीबार, प्रकृती गंभीर; लिलावती रूग्णालयात उपचार सुरु
बाबा सिद्दीकींवर गोळीबार, प्रकृती गंभीर; लिलावती रूग्णालयात उपचार सुरु.
'गाय राज्यमाता झाली तर मग गाईचा हंबरडा काय...', ठाकरेंचा सरकारवर निशाण
'गाय राज्यमाता झाली तर मग गाईचा हंबरडा काय...', ठाकरेंचा सरकारवर निशाण.
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार.
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'.